गुहागर, ता. 30 : गुहागर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी आज मंगळवार दि. २९ ऑक्टोबर अखेरपर्यंत एकूण १५ उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी गुहागर यांच्याकडे प्राप्त झाले असून एकूण १३ उमेदवार रिंगणार आहेत. आता कोण अर्ज माघार घेणार व यांमध्ये कुणामध्ये खरी लढत होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे. Received 15 applications in Guhagar

उमेदवारी अर्ज दाखल करण्यामध्ये शिवसेना उबाठा गटाकडून भास्कर जाधव, महायुतीकडून राजेश बेंडल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्रमोद गांधी, अपक्ष उमेदवार संतोष जैतापकर, अपक्ष उमेदवार सुनील जाधव, आरपीआयचे आठवले गट संदेश मोहिते, विक्रांत जाधव, अपक्ष दीपक शिगवण, अपक्ष सुनील काते, मोहन रामचंद्र पवार, संदीप फडकले, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमोद आंब्रे यांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्जांची छाननी ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता तर अर्ज मागे घेण्याची तारीख ४ नोव्हेंबर दुपारी ३ पर्यंत आहे. Received 15 applications in Guhagar