रत्नागिरी, ता. 23 : अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे मंदिर व मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त आयोजित त्रिवार जयजयकार हा ३५ कलाकारांनी मिळून सादर केलेल्या सांगितीक कार्यक्रमाला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमात स्थानिक कारसेवकांचा हृद्य सन्मान रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे करण्यात आला. खातू नाट्यमंदिरात हा कार्यक्रम रंगला. Ratnagirikar mesmerized by the Jayjaykara Rama program
या कार्यक्रमात आनंद पाटणकर, नरेंद्र रानडे, श्रीधर पाटणकर, अभिजित भट, अभिजीत नांदगावकर, चैतन्य परब, संध्या सुर्वे, अनुराधा गोखले, इरा गोखले, कश्मिरा सावंत, वैष्णवी जोशी, करूणा पटवर्धन, श्वेता जोगळेकर, तन्वी मोरे यांनी गायन केले. त्यांना तबलासाथ हेरंब जोगळेकर, पांडुरंग बर्वे, सचिन भावे, केदार लिंगायत, निखिल रानडे, राजू धाक्रस, हार्मोनियमसाथ विजय रानडे, चैतन्य पटवर्धन, निरंजन गोडबोले, संतोष आठवले, मंगेश मोरे यांनी केली. पखवाज राजा केळकर आणि मंगेश चव्हाण, कि- बोर्ड राजू किल्लेकर, तालवाद्य साथ प्रा. सुहास सोहनी आणि हरेश केळकर यांनी केली. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण व प्रभू राम, अयोध्या, कारसेवक असे विविध संदर्भ घेत निबंध कानिटकर आणि पूर्वा पेठे यांनी सुरेख निवेदन केले. Ratnagirikar mesmerized by the Jayjaykara Rama program
जयजय रामकृष्ण हरी गीताने कार्यक्रमाला सुरवात झाली. चैतन्य परबने आरंभी वंदीन आणि वैष्णवी जोशी हिने आज अयोध्या सजली ही गीते अप्रतिम म्हटली. त्यानंतर श्रीधर पाटणकरने ध्यान लागले रामाचे, कश्मिरा सावंतने ठुमक चलत व अभिजित भटने राम रंगी रंगले ही गीते स्पष्ट व दमदार आवाजात ऐकवली. इरा गोखले हिने राम राम जप करी सदा हे गीत अतिशय सुंदर रितीने ऐकवले. अनुराधा गोखले यांनी श्रीराम चंद्र कृपाळू, ज्येष्ठ गायिका संध्या सुर्वे यांनी विश्वाचा विश्राम ही गीते लीलया सादर केली. अभिजित नांदगावकर यांच्या पहाडी आवाजातील सेतू बांधा रे या गीताने वातावरण राममय झाले. Ratnagirikar mesmerized by the Jayjaykara Rama program
नरेंद्र रानडे यांनी अविरत ओठी, तन्वी मोरे हिने काल मी रघुनंदन पाहिले, कश्मिरा सावंत व अभिजित भटने राम का गुणगान, करुणा पटवर्धन यांनी राम भजन कर मन, विजय पताका श्वेता जोगळेकर ही गीते सुरेल आवाजात सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. ज्येष्ठ गायक आनंद पाटणकर यांनी संहारूनी अरी ही भैरवी सादर केली. तर त्रिवार जयजयकार या गीताने कार्यक्रमाचा सांगता झाली. कार्यक्रमाची ध्वनी, प्रकाशव्यवस्था उदयराज सावंत, रंगमंच प्रशांत साखळकर, सजावट मिलिंद गुरव यांनी केली. यावेळी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन, सचिव सतीश शेवडे, नियामक मंडळ सदस्य मनोज पाटणकर यांच्या हस्ते कारसेवकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. Ratnagirikar mesmerized by the Jayjaykara Rama program