उद्योगमंत्री उदय सामंत; प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू राहण्यासाठी करणार प्रयत्न
गुहागर, ता. 07 : रत्नागिरी वीज प्रकल्पातील पॉवर ब्लॉक मध्ये ठेकेदारी पद्धतीत सुमारे 16 वर्ष काम करणाऱ्या 15 स्थानिक कामगारांना उत्पादन कमी यामुळे कंपनीने कामावरून कमी केले. हे कामगार उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे दाद मागण्यासाठी गेले असता कंपनी प्रशासनाला सांगून त्यांना पूर्ववत कामावर ठेवण्याची तंबी दिली व कंपनीने ते मान्य करत या कामगारांना कामावर परत घेतले. Ratnagiri power plant workers got justice
गेल्या वर्षभर रत्नागिरी वीज प्रकल्प कंपनीत पूर्णपणे वीज क्षमता उत्पादन करण्याची कार्यक्षमता असूनही वीज उत्पादनासाठी लागणारा गॅस अत्यंत महाग झाल्याने विजेचा दर परवडत नसल्याने या कंपनीकडून वीज घेण्यास कोणी तयार होत नाही. यामुळे वीज उत्पादन कमी कारण सांगून स्थानिक कामगार कमी करण्याचे सत्र चालू आहे. आतापर्यंत अनेक कामगारांना यामुळे कंपनीने कमी केले आहे. असेच या कंपनीतील पॉवर ब्लॉक मध्ये काम करणाऱ्यांना 16 स्थानिक कामगारांना सप्टेंबर पासून कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. याबाबत या कामगारांनी कंपनी प्रशासनाकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला परंतु या प्रयत्नांना यश आले नाही. या कामगारांनी किरण सामंत व सिंधू रत्न योजनेचे संचालक प्रशासकीय जिल्हाधिकारी साहेब यांची या विषयात भेट घेतली यामुळे या विषयाला चालना मिळाली. Ratnagiri power plant workers got justice
स्थानिकांना न्याय मिळवून देण्यासाठी उदय सामंत यांनी रत्नागिरी विद्युत प्रकल्प कंपनीचे एचआर मॅनेजर जॉर्ज फिलिप्स यांना व कंपनीतून काढलेल्या 16 कामगारांची एकत्र बैठकीचे नियोजन केले. या बैठकीत स्थानिकांनाच जर रोजगार मिळणार नसेल तर अशा कंपन्यांचा काय उपयोग आहे असे कंपनीला सुनावले. यावेळी कंपनी प्रशासनाने नोव्हेंबर 2023 पर्यंत दिलेल्या रोस्टर प्रमाणे कामावर सामावून घेण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच डिसेंबर पासून पूर्ववत नियमित सर्व कामगारांना रोजगार मिळेल अशी हमी दिली. यासाठी उदय सामंत त्यांचे विश्वासू सहकारी संदेश कलगुटकर, युवासेना जिल्हा संघटक मुन्ना देसाई, युवासेना जिल्हा समन्वयक अमरदीप परचूरे व आदी पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. Ratnagiri power plant workers got justice
यावेळी रत्नागिरी वीज प्रकल्पाचे एच आर मॅनेजर फिलिप्स यांनी उरण येथील पुरवठा होणारा गॅस आरजीपीएलला मिळाला तर वीज जर आम्हाला नियंत्रित ठेवता येतील व हा प्रकल्प सुरू होण्याकरता चालना मिळेल अशी विनंती केली. त्यावर माननीय मंत्री महोदय यांनी कंपनी संदर्भातील सर्व टेक्निकल माहिती माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्यासमोर आपण ठेवू . तसेच हा प्रकल्प राज्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे हे देखील त्यांना सांगू. भविष्यात हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी स्वतः केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. Ratnagiri power plant workers got justice