• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 August 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरी वीज प्रकल्पातील कामगार पूर्ववत कामावर

by Manoj Bavdhankar
November 7, 2023
in Guhagar
152 1
4
Ratnagiri power plant workers got justice

राज्याचे उद्योग मंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदय जी सामंत याचे बरोबर चर्चा करताना आरजीपीएलल चे अधिकारी व कर्मचारी

298
SHARES
851
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

उद्योगमंत्री उदय सामंत; प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू राहण्यासाठी करणार प्रयत्न

गुहागर, ता. 07 : रत्नागिरी वीज प्रकल्पातील पॉवर ब्लॉक मध्ये ठेकेदारी पद्धतीत सुमारे 16 वर्ष काम करणाऱ्या 15 स्थानिक कामगारांना उत्पादन कमी यामुळे कंपनीने कामावरून कमी केले. हे कामगार उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे दाद मागण्यासाठी गेले असता कंपनी प्रशासनाला सांगून त्यांना पूर्ववत कामावर ठेवण्याची तंबी दिली व कंपनीने ते मान्य करत या कामगारांना कामावर परत घेतले. Ratnagiri power plant workers got justice

Ratnagiri power plant workers got justice

गेल्या वर्षभर रत्नागिरी वीज प्रकल्प  कंपनीत पूर्णपणे वीज क्षमता उत्पादन करण्याची कार्यक्षमता असूनही वीज उत्पादनासाठी लागणारा गॅस अत्यंत महाग झाल्याने विजेचा दर परवडत नसल्याने या कंपनीकडून वीज घेण्यास कोणी तयार होत नाही. यामुळे वीज उत्पादन कमी कारण सांगून स्थानिक कामगार कमी करण्याचे सत्र चालू आहे. आतापर्यंत अनेक कामगारांना यामुळे कंपनीने कमी केले आहे. असेच या कंपनीतील पॉवर ब्लॉक मध्ये काम करणाऱ्यांना 16 स्थानिक कामगारांना सप्टेंबर पासून कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. याबाबत या कामगारांनी कंपनी प्रशासनाकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला परंतु या प्रयत्नांना यश आले नाही. या कामगारांनी किरण सामंत व सिंधू रत्न योजनेचे संचालक प्रशासकीय  जिल्हाधिकारी साहेब यांची या विषयात भेट घेतली यामुळे या विषयाला चालना मिळाली. Ratnagiri power plant workers got justice

स्थानिकांना न्याय मिळवून देण्यासाठी उदय सामंत यांनी रत्नागिरी विद्युत प्रकल्प कंपनीचे  एचआर मॅनेजर  जॉर्ज फिलिप्स यांना व कंपनीतून काढलेल्या 16 कामगारांची एकत्र बैठकीचे नियोजन केले. या बैठकीत स्थानिकांनाच जर रोजगार मिळणार नसेल तर अशा कंपन्यांचा काय उपयोग आहे असे कंपनीला सुनावले. यावेळी कंपनी प्रशासनाने  नोव्हेंबर 2023 पर्यंत दिलेल्या रोस्टर प्रमाणे  कामावर सामावून घेण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच डिसेंबर पासून पूर्ववत नियमित सर्व कामगारांना रोजगार मिळेल अशी हमी दिली. यासाठी उदय सामंत त्यांचे विश्वासू सहकारी संदेश कलगुटकर, युवासेना जिल्हा संघटक मुन्ना देसाई, युवासेना जिल्हा समन्वयक अमरदीप परचूरे व आदी पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. Ratnagiri power plant workers got justice

यावेळी रत्नागिरी वीज प्रकल्पाचे एच आर मॅनेजर फिलिप्स यांनी उरण येथील पुरवठा होणारा गॅस  आरजीपीएलला मिळाला तर वीज जर आम्हाला नियंत्रित ठेवता येतील व हा प्रकल्प सुरू होण्याकरता चालना मिळेल अशी विनंती केली. त्यावर माननीय मंत्री महोदय यांनी कंपनी संदर्भातील सर्व टेक्निकल माहिती  माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्यासमोर आपण ठेवू . तसेच हा प्रकल्प राज्याच्या दृष्टीने  किती महत्त्वाचा आहे हे देखील त्यांना सांगू. भविष्यात हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी  स्वतः केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. Ratnagiri power plant workers got justice

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarRatnagiri power plant workers got justiceUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share119SendTweet75
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.