शाखेच्या 60 वा वर्धापनदिन व ग्राहक मेळावा दि. 2 रोजी संपन्न होत आहे
गुहागर, ता. 01 : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लि. रत्नागिरी शाखा गुहागर यांच्या वतीने शाखेच्या 60 व्या वर्धापनदिन मंगळवार दि. 2 मे 2023 रोजी संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने श्री सत्यनारायणाची महापुजेचे आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्वांनी स. 10 ते सायं. 6 यावेळेत तिर्थप्रसाद लाभ घ्यावा, असे रत्नागिरी शाखेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. Ratnagiri District Central Guhagar Branch Anniversary
या वर्धापनदिनाचे औचित्य साधून सकाळी 11 वा. ग्राहक मेळावा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून र.जि.म.स. बॅक लि. रत्नागिरीचे संचालक मा. डॉ. अनिल विठ्ठल जोशी, मा. श्री. राजेंद्र दिनकर सुर्वे, मा. श्री. संजय राजाराम रेडीज उपस्थित राहणार आहेत. Ratnagiri District Central Guhagar Branch Anniversary

तरी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या सभासद, ठेविदार, कर्जदार, हितचिंतक आदिंनी ग्राहक मेळाव्याला उपस्थित रहावे असे आवाहन श्री. महेश चंद्रशेखर रजपूत, सहाय्यक सरव्यवस्थापक क्षेत्रिय कार्यालय, पाटपन्हाळे, श्री. नंदन ज्ञानेश खानविलकर व्यवस्थापक क्षेत्रिय कार्यालय, पाटपन्हाळे आणि श्री. प्रसाद मारूती कचरेकर, शाखाधिकारी गुहागर यांनी केले आहे. Ratnagiri District Central Guhagar Branch Anniversary
