रत्नागिरीतील लोकमान्य सोसायटीत साकारली भव्य रंगावली
रत्नागिरी, ता. 27 : अयोध्येतील राम मंदिर स्थापनेचा आनंद देशभर उत्साहात साजरा झाला. रत्नागिरीतील प्रसिद्ध टिळक आळीतील श्री लोकमान्य सहकारी गृहनिर्माण संस्थेतील रहिवाशांनी एकत्र येत राम मंदिराची भव्य रंगावली साकारली. तसेच रामरक्षा पठण करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी सर्व रहिवाशांनी पारंपरिक वेशभूषा केली होती. Rangoli of Ram Mandir made in Lokmanya Society


श्री लोकमान्य गृहनिर्माण संस्थेतील प्रा. सौ. तेजश्री भावे यांनी राम मंदिर व मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त सर्वांनी मिळून रंगावली व कार्यक्रम करूया, अशी संकल्पना मांडली. सर्व सभासद, महिलांनी ही संकल्पना उचलून धरली आणि रंगावली साकारली. ३० फूट बाय २० फुटांची राम मंदिराची रंगावली साकारली. याकरिता ८० किलो रंगावली लागली. रंगावली साकारण्यासाठी सुमारे १६ तास लागले. ही रंगावली अवनी मुकादम, जिया आणि केदार पेजे, रिद्धी हजारे, सोनाली चव्हाण, पौर्णिमा साठे, तेजश्री भावे, सुनेत्रा गिजरे, सीमंतिनी करमरकर यांनी काढली. विशेष सहाय्य स्वरूप साळवी यांचे लाभले. तसेच सभासदांनीही सहकार्य केले. या रंगावलीसह जय श्रीराम लिहून त्यावर पणत्या ठेवून दीपोत्सवही साजरा करण्यात आला. त्यानंतर सामूहिक रामरक्षा पठण कार्यक्रम झाला आणि स्नेहभोजनाने सांगता झाली. Rangoli of Ram Mandir made in Lokmanya Society