आम्ही गिरगावकर या सामाजिक संस्थेचा उपक्रम
मुंबई, ता. 05 : येथील आम्ही गिरगावकर या सामाजिक संस्थेने महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या भग्नावस्थेला सुधारण्यासाठी “रंग दे माझी शाळा” हा उपक्रम हाती घेतला असून, गेल्या दोन वर्षात राज्यातील शेकडो शाळांच रंगरूप पालटून त्या प्रसन्न आणि बहारदार करून दाखवल्या असल्याने राज्यभर या उपक्रमाची चर्चा आहे. शासकीय कचाट्यात न सापडता स्वतःहून मुलांना ज्या विद्याप्रांगणात शिक्षण मिळते ती जागा प्रसन्न असावी असे ध्येय समोर ठेवून मुंबईतील “आम्ही गिरगावकर” ही सामाजीक संस्था हा उपक्रम राबवत आहे. “Rang De Majhi School” activity across Maharashtra
राज्यभरातून असंख्य शाळांकडून “रंग दे माझी शाळा”उपक्रमाबाबत चौकशी होत असून “आम्ही गिरगावकर” संस्थेचे सदस्य शक्यतो सर्व शाळांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. सदर उपक्रमाअंतर्गत चिपळूण केंद्रातील ७ नादुरुस्त जिल्हा परिषद शाळांची डागडुजी पूर्ण झाली असून आता उक्ताड, स्वयंदेव आणि गुहागर येथील उमराठ या तीन शाळांचे रंगसाहित्य नुकतेच शाळांना प्राप्त झाले असून उमराठ गावचे सरपंच श्री. जनार्दन आंबेकर या शाळांची नियोजनबध्द रितीने रंगरंगोटी हाताळत आहेत. “Rang De Majhi School” activity across Maharashtra


शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान आणि सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांचे या उपक्रमाला विशेष सहकार्य लाभले आहे. आम्ही गिरगांवकर संस्थेचे सर्व सदस्य या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी आणि सर्व शाळांचा या उपक्रमाला लाभ मिळवून देण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न करत आहेत. गौरव सागवेकर, मिलिंद वेदपाठक, शिल्पा नायक, विघ्नेश सुंदर, कुणाल लिमजे आणि संपूर्ण आम्ही गिरगावकर टीमचा या उपक्रमासाठी सहभाग लाभला आहे. “Rang De Majhi School” activity across Maharashtra
गुहागर तालुक्यातील उमराठ या गावातील जि. प. उमराठ शाळा नं.१ या शाळेच्या रंगरंगोटीसाठी “आम्ही गिरगावकर” या संस्थेच्यावतीने आवश्यक तेवढा रंग उपलब्ध करून दिल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान आणि सारस्वत बॅंकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर तसेच “आम्ही गिरगावकर” या संस्थेचे सदस्य गौरव सागवेकर, मिलिंद वेदपाठक, शिल्पा नायक, विघ्नेश सुंदर, कुणाल लिमजे आणि संपुर्ण “आम्ही गिरगावकर” टिमचे ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी अभिनंदन करून मनःपूर्वक आभार मानले आहेत. “Rang De Majhi School” activity across Maharashtra
ज्या गावांतील जिल्हा परिषद शाळेंचा रंग खराब झालेला आहे आणि रंगरंगोटी करणे अत्यावश्यक आहे, अशा शाळेंच्या मुख्याध्यापकांनी अधिक माहितीसाठी संस्थेचे सदस्य मिलिंद वेदपाठक (मोबा. 9820795580) व ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर (8767433840) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. “Rang De Majhi School” activity across Maharashtra