पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनिल तटकरे, प्रवक्त्त्या ज्योतीताई वाघमारे यांची उपस्थिती
गुहागर, ता. 09 : गुहागर विधानसभा मतदार संघाच्या २००९ च्या निवडणूकीमध्ये गुहागर ढवळून काढणारे शिवसेना नेते रामदासभाई कदम प्रदिर्घ कालावधीनंतर प्रथमच गुहागरमध्ये खास सभेसाठी येत आहेत. आज ९ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता शृंगारतळीमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी १० हजार कार्यकर्ते सामावू शकतील असे नवे मैदान बनवीण्याची तयारी जोरादरपणे सुरू आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी याबाबत गुहागरमध्ये पत्रकार परिषद घेऊन माहीती दिली. Ramdasabhai Kadam today in Guhagar
यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रभाकर शिर्के, तालुका प्रमुख दिपक कनगुटकर, शहर प्रमुख निलेश मोरे, प्रल्हाद विचारे, नारायण गुरव, खेडचे तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण, अमरदिप परचुरे आदी उपस्थित होते. शशिकांत चव्हाण यांनी याबाबत माहीती देताना गुहागर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मागणीच सन्मान करून नेते रामदासभाईंनी ही सभा आयोजित केली आहे. त्यांच्यावर प्रेम करणारा वर्ग मोठया प्रमाणावर आहे. यामुळे अनेक जुनेजाणते कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते यावेळी जाहीर प्रवेश करणार आहेत. या सभेमध्ये पालकमंत्री उदय सामंत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, आमदार योगेश कदम, शिवसेना प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. Ramdasabhai Kadam today in Guhagar
या सभेला १० हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील तर सभा यशस्वी करण्यासाठी गुहागर विधानसभा मतदार संघात जोरदार तयारी सुरू आहे. प्रत्येकजण जोमाने काम करत असून जोरदार तयारीला लागले असून यावेळी कोणत्याही परिस्थितीत
परिवर्तन करणारच असा निर्धार व्यक्त होत आहे. Ramdasabhai Kadam today in Guhagar