संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 11 : तालुक्यातील आबलोली येथील आनंदवन बुद्ध विहार मौजे आबलोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात श्री.दत्ताराम कदम यांच्या अध्यक्षतेखाली विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शैक्षणिक, सामाजिक, राजकीय लढ्यात सावली सारखी साथ देणा-या त्यांच्या सुविद्य पत्नी आणि त्याग मुर्ती आदर्श माता आई रमाई भिमराव आंबेडकर यांची १२६ वी जयंती उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. Ramai Ambedkar Jayanti in Aabloli
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/02/adv.jpg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/02/adv.jpg)
यावेळी आनंदवन नगर आबलोली मधील महिलांचे हस्ते त्याग मुर्ती आदर्श माता आई रमाई भिमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, दिपप्रज्वलन करुन प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर बुध्द वंदनेचा, बुद्ध पुजा पाठाचा कार्यक्रम संपन्न झाला. आनंदवन संस्थेचे सचिव श्री.अविनाश कदम यांनी प्रास्ताविकात रमाई आंबेडकर यांची महत्वपूर्ण माहिती दिली. त्यानंतर कु.समृध्दी पवार, कु.गौरी कदम, कु.अभिराज कदम, सौ.मिनल कदम, श्री.अनंत पवार, श्री.बापू पवार, श्री.संजय कदम, श्री.महेंद्र कदम, श्री.अविनाश कदम, अध्यक्ष श्री.दत्ताराम कदम यांनी आदर्श माता रमाई आंबेडकर यांच्या जिवनावर मौलिक मार्गदर्शन केले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश कदम यांनी केले. यावेळी आनंदवन नगर आबलोली मधील महिला, पुरुष, लहान मुली, मुले बहूसंख्येने उपस्थित होती. Ramai Ambedkar Jayanti in Aabloli