लखनौ, ता. 13 : अयोध्येतील राम मंदिरातील मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी लखनौ पीजीआय येथे अखेरचा श्वास घेतला. ३ फेब्रुवारी रोजी मेंदूत रक्तस्त्राव झाल्यानंतर आचार्य सत्येंद्र दास यांना लखनौ पीजीआयच्या न्यूरोलॉजी वॉर्डच्या एचडीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. आचार्य सत्येंद्र दास यांच्या निधनाने अयोध्येच्या मठ मंदिरांमध्ये शोककळा पसरली आहे. राम मंदिर ट्रस्टने त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. सत्येंद्र दास यांनी सुमारे ३३ वर्षे राम मंदिराची सेवा केली. Ram temple priest Satyendra Das is No More


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आचार्य सत्येंद्र दास यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महान रामभक्त, श्री रामजन्मभूमी मंदिर, अयोध्या धामचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र कुमार दास महाराज यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. सामाजिक आणि आध्यात्मिक जगताचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली, असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. सत्येंद्र दास यांनी सुमारे ३३ वर्षे राम मंदिराची सेवा केली. फेब्रुवारी १९९२ मध्ये, जेव्हा ‘वादग्रस्त जमिनी’मुळे रामजन्मभूमीची जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे सोपवण्यात आली, तेव्हा जुने पुजारी महंत लालदास यांना काढून टाकण्याबाबत चर्चा सुरू झाली. दरम्यान, १ मार्च १९९२ रोजी सत्येंद्र दास यांची नियुक्ती भाजप खासदार विनय कटियार, विश्व हिंदू परिषद नेते आणि तत्कालीन विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख अशोक सिंघल यांच्या संमतीने करण्यात आली. Ram temple priest Satyendra Das is No More