गुहागर, ता. 06 : गुहागर विधानसभा मतदार संघातून बहुजन आणि बहुसंख्य असलेल्या कुणबी व ओबीसी बाबत प्रेम, आपुलकी व आस्था असलेल्या प्रस्थापित राजकिय पक्षांनी राजेश बेंडल यांना निवडणूक रिंगणात उतरवावे, असे कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई ग्रामीण शाखा तालूका गुहागर अध्यक्ष पांडुरंग पाते यांनी सांगितले. Rajesh Bendal should be fielded in the assembly arena


गुहागरचे माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ बेंडल यांच्यानंतर गुहागर तालुक्यातील कोणत्याच प्रस्थापित राजकिय पक्षाने गुहागर विधानसभे करिता बहुजन व बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजाला उमेदवारी दिली नाही. पंचायत समिती सदस्य, क्वचित वेळी सभापती उपसभापती आणि एखादवेळी जिल्हा परिषद सदस्य एवढ्यावरच बोळवण केली गेली. मात्र कुणबी व ओबीसी असलेल्या व्होट बँकेचा प्रस्थापितांनी स्वतःसाठी पध्दतशीर वापर करुन घेतला आहे. Rajesh Bendal should be fielded in the assembly arena आ
जपर्यंत दुसर्यांसाठी खपणारा, राबणारा बहुजन कुणबी व बहुसंख्य ओबीसी समाज घटक आता त्याचा स्वतःचा विचार करु लागला आहे. आता माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ बेंडल यांचे सुपुत्र, माजी सभापती, माजी नगराध्यक्ष व युवानेते राजेश बेंडल यांना उमेदवारी द्यावी. अशी जनमाणसातून आग्रही मागणी होत आहे. असे पाते यांनी सांगितले. Rajesh Bendal should be fielded in the assembly arena