दि.८ नोव्हेंबर रोजी पाटपन्हाळे हायस्कूल पटांगण
गुहागर, ता. 06 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागरचे उमेदवार प्रमोद गांधी यांच्या प्रचारासाठी मनसेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांची जाहीर सभा शुक्रवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी पाटपन्हाळे हायस्कूल पटांगण येथे सकाळी १० वा.आयोजित करण्यात आली आहे. Raj Thackeray’s campaign meeting in Guhagar
गुहागर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा गटाकडून आमदार भास्कर जाधव, शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून राजेश बेंडल, मनसे कडून प्रमोद गांधी व अन्य उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांच्या विरोधामध्ये मनसेकडून प्रमोद गांधी उभे आहेत. मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या सभेने मनसे सैनिकांमध्ये तसेच राज साहेब ठाकरे यांना मानणाऱ्या सर्व त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. या सभेमध्ये राज साहेब ठाकरे नेमके काय बोलणार आहेत. याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे. Raj Thackeray’s campaign meeting in Guhagar