कोळवली हायस्कूल खो-खो संघ मुलींचा विजेता तर मुलांचा उपविजेता
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 21 : क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा कार्यालय विभाग रत्नागिरी यांच्या वतीने सन २०२४/२५ या शैक्षणिक वर्षासाठीच्या तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धा नुकत्याच पालपेणे हायस्कूलच्या भव्य क्रीडा मैदानावर संपन्न झाल्या. या स्पर्धेत ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था पंचक्रोशी कोळवली या हायस्कूलच्या १९ वर्षाखालील मुलींच्या खो-खो संघाने जबरदस्त कामगिरी करत अव्वल स्थान पटकावले. त्याचबरोबर मुलांच्या खो-खो संघानेही १७ वर्षाखालील गटात उपविजेतेपद मिळवून क्रीडा क्षेत्रातील शाळेच्या नावाचा दरारा कायम ठेवला आहे. Rainy sports competition
तालुकास्तरावर घवघवीत यश संपादन करणाऱ्या व उपस्थितांची वाहवा मिळवणाऱ्या मुलींच्या आणि मुलांच्याही संघाचे ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.शांताराम वाघे, संस्थेचे उपाध्यक्ष श्री.बाबाजी मुंडेकर, सचिव श्री.नारायण मोहिते, सहसचिव श्री. शंकर जोशी, संस्थेचे सदस्य श्री.वासुदेव डिंगणकर, श्री.नंदकिशोर सुर्वे, श्री.दामोदर डिंगणकर, श्री.रामचंद्र मोरे, श्री.सदानंद जोशी, श्री.रवींद्र गावडे, श्री.संतोष डिंगणकर तसेच श्री.अमोल वाघे, श्री.संतोष आंब्रे, श्री. वामन जाधव, श्री.एस.आर.मुलाणी या सर्वांनी अभिनंदन केले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षक श्री.बाळासाहेब लवटे, श्री.सी.एस.पांडे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी श्री.विकास कदम यांचेही कौतुक आणि अभिनंदन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री.एम. वाय.पाटील व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. Rainy sports competition