रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
मुंबई, ता. 06 : राज्यात पावसाचा जोर अजूनही चार ते पाच दिवस कायम राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर तर विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Rain continues in the state


मध्य महाराष्ट्रात नाशिक पुणे व सातारा या जिल्ह्यांच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार म्हणजे २०० मीमी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मैदानी भागात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने तिथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. कोल्हापूर, पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा व तुरळक ठिकाणी वादळी वाढत पाऊस पडण्याची शक्यता शक्यता आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. विदर्भात सहा ते आठ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. Rain continues in the state