पती -पत्नी जवळच्या शाळेत येण्यासाठी शिक्षिकेचा खटाटोप
गुहागर, ता. 04 : गुहागर शिक्षण विभागात सध्या काहीना काही घडत असून या विभागाच्या कारभारावर सध्या जनतेतून प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत.सुमारे चार महिन्यापूर्वी झालेल्या बदल्यांमध्ये एकाच तारखेच्या एकाच जावक नंबरवरती पंचायत समितीच्या बांधकाम खात्याकडून एकाच शिक्षिकेने पती – पत्नी जवळच्या शाळेत येण्यासाठी दोन दाखले घेतल्याचे समोर आले आहे. Question mark on education department governance
गुहागर तालुक्यातील एका जि.प.च्या मोठ्या शाळेतील शिक्षिकेने पती – पत्नी जवळच्या शाळेत येण्यासाठी बदलीचा अर्ज केला होता. मात्र या बदलीसाठी ३० किमी. पेक्षा जास्त अंतर असावे लागते असा निकष आहे. त्यासाठी या शिक्षिकेने गुहागर पंचायत समितीकडे दाखला मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्याप्रमाणे संबधित विभागाकडून २६.३०० किमी. असा दाखला देण्यात आला. तर त्याच तारखेचा व त्याच जावक नंबरचा त्याच अंतराबाबत दुसरा दाखला ३०.३०० किमी. चा दाखला देण्यात आला. अंतर वाढवून आपली बदली करून घेण्यामध्ये ही शिक्षिका यशस्वी झाली. मात्र शिक्षण विभागाची यामध्ये फसवणूक झाल्याचे बोलले जात आहे. हे दोन्ही दाखले वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी दिल्याचे समोर आले आहे. जाणीवपूर्वक अंतर वाढवून देणाऱ्या या अधिकाऱ्यावर कारवाई होणार का ? याबाबत सर्वत्र चर्चा सुरु आहे. Question mark on education department governance
सदरहू महिला शिक्षिकेने हा दाखला मिळण्यासाठी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अर्ज केल्याचे निष्पन्न होत असून दाखले मात्र पंचायत समिती बांधकाम विभागाकडून देण्यात आले आहेत. ज्या दिवशी अर्ज केला आहे त्याच दिवशी हे दोन्ही दाखले या शिक्षिकेने मिळवले आहेत. सर्व सर्वसामान्य माणसाला काही काम असेल तर आठ ते दहा दिवस फेऱ्या माराव्या लागतात. Question mark on education department governance