• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 December 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बाळासाहेब लबडे यांच्या “चिंबोरेयुद्ध” कादंबरीचे प्रकाशन

by Guhagar News
May 30, 2024
in Maharashtra
97 1
0
Publication of the novel "Chimboreyuddha"
190
SHARES
544
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 30 : दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्यावतीने, अथर्व पब्लिकेशन, जळगाव, प्रकाशित “चिंबोरेयुद्ध”-या प्रसिद्ध साहित्यिक बाळासाहेब लबडे लिखित कादंबरी प्रकाशन कार्यक्रम रविवार दि.०२/०६/२०२४ जून रोजी संध्याकाळी ५.वा. पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे.येथे आयोजित करण्यात आला आहे. Publication of the novel “Chimboreyuddha”

या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मा. भारत सासणे हे असणार आहेत. तर कादंबरीचे प्रकाशन प्रा.डाँ दिपक बोरगावे (प्रसिद्ध कवी, समीक्षक, अनुवादक, संशोधक, पुणे.)यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आणि प्रमुख वक्ते म्हणून श्री. दागो काळे(समीक्षक, कवी, संपादक, शेगाव)हे असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून श्री रामदास नेहूलकर सहसंपादक दै केसरी हे आहेत. Publication of the novel “Chimboreyuddha”

मा. शिरीष चिटणीस (पुणे शहर प्रतिनिधी, म.सा.प.पुणे, अध्यक्ष, दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सातारा.)हे आणि श्री. युवराज माळी( प्रकाशक अथर्व पब्लिकेशन, जळगाव) यांची प्रमुख उपस्तिथी असेल तर सूत्रसंचालन डॉ. संजय बोरूडे (प्रसिद्ध साहित्यिक) करतील. बाळासाहेब लबडे यांची ही चौथी कादंबरी आहे. तिचा मलपृष्ठ मजकूर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त श्री दामोदर मावजो यांचा,””चिंबोरेयुद्ध”  म्हणजे उत्तरआधुनिक कादंबरी-अंतर्गत एक अभिनव, अभिजात कादंबरी प्रकार आहे ज्याला अ-कादंबरी म्हणता येईल. साहित्यांतील सारे सिद्धांत, वाद, ‘इजम्स’ धाब्यावर बसवत ‘अँब्सर्डिटी’ संज्ञेला नजिक जाऊ पहाणारी ही संहिता म्हणजे चिंबोऱ्यांच्या मुखातून वर्तमान स्थितीवरील विशिष्ट शैलीतून केलेले ब्लँक सटायर आहे असा आहे. Publication of the novel “Chimboreyuddha”

'Remove' Hoarding

प्रा. डाॅ.बाळासाहेब लबडे हे चांगले शिक्षक, समीक्षक, कादंबरीकार, कवी, गझलकार, गीतकार, संशोधक,संपादक, साहित्य चळवळीचे मानकरी ,नामवंत वक्ते,अनेक राज्यस्तरिय व राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी,विविध वाहिन्यांवर व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कविता मनामनातली, खारवी बोलीच्या कविता, विडंबन कविता, असे कार्यक्रम सादर करणारे, पसायदान प्रतिष्ठानचे अध्यक्ष,  खरे- ढेरे-भोसले महाविद्यालय गुहागर. जि. रत्नागिरी. येथे गेल्या २५ वर्षांपासून मराठी विभागप्रमुख म्हणून सेवेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४ विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. ८ विद्यार्थ्यी संशोधन करीत आहेत. त्यांची एकूण १६ पुस्तके प्रकाशित आहेत. या पुस्तकांना मानाचे ३० पुरस्कार आहेत. मराठी कादंबरीच्या परिवर्तनाच्या टप्प्यावरील “पिपिलिका मुक्तिधाम” “काळमेकर लाइव्ह सारख्या नवकादंबरींचे लेखन, नामदेव ढसाळ, नारायण सुर्व यांच्या नंतर मुंबईचे दखलपात्र चित्रण करणारा “मुंबई बंबई बाँम्बे” कवितासंग्रह, चित्रे कोलटकर यांच्यानंतर “महाद्वार” सारखा मराठी कवितेत मैलाचा दगड ठरलेला कविता संग्रह, ब्लाटेंटिया, एक कैफियत सारखे कवितासंग्रह मराठी कादंबरीतील पहिल्या रांगेतील ठरलेली अनोखी” शेवटची लाओग्राफिया” ही कादंबरी, काळमेकर लाइव्ह सारखी आगळी वेगळी कांदंबरी त्यांची आहे. “१९९० नंतरची थीम कविता” हे संपादन मराठील पहिले प्रायोगीक संपादन,”एक कैफियत” सारखा भन्नाट गझल संग्रह,”वाटर स्टोरिज” या सनस्टोन प्रकाशन अमेरिका ,प्रकाशित पुस्तकातुन त्यांच्या दोन कथा कँनडा युरोप जर्मनी सह जगभरातील ग्रंथालयात पोहचल्या आहेत.” शिष्यवृत्ती” “नौटंकी” या आगामी चित्रपटासाठी त्यांची गाणी आहेत. मराठीतील दिग्गज समीक्षकांनी ज्ञानपीठकार दामोदर मावजो, रत्नाकर मतकरी, डाँ नागनाथ कोत्तापल्ले, डाँ रावसाहेब कसबे,डाँ आनंद पाटील ,डाँ लुलेकर,लक्ष्मीकांत देशमुख,ए. के. शेख ,डाँ सांगोलेकर,वगैरेनी त्यांची दखल घेऊन त्यांचे स्थान अधोरेखन केले आहे.या कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असे आयोजक संस्थेने आवाहन केले आहे. Publication of the novel “Chimboreyuddha”

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarPublication of the novel "Chimboreyuddha"Updates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share76SendTweet48
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.