• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 October 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

‘चिंबोरे युद्ध’च्या कन्नड अनुवादाचे कोप्पळ येथे प्रकाशन

by Mayuresh Patnakar
October 3, 2026
in Guhagar
20 0
0
Publication of Kannada translation of Chimborey War
39
SHARES
110
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ज्येष्ठ साहित्यिक, कन्नड साहित्य अकादमी पुरस्कारविजेते अल्लमप्रभू बेट्टदूर यांच्या हस्ते प्रकाशन

गुहागर, ता. 03 : प्रयोगशील कादंबरीकार, कवी, गीतकार, गझलकार, कथाकार, अनुवादक, संशोधक व संपादक प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या गाजलेल्या ‘चिंबोरे युद्ध’ या कादंबरीचा कन्नड अनुवाद कन्नड वाचकांच्या भेटीला येत आहे. या कन्नड आवृत्तीचे प्रकाशन ३ ऑक्टोबर रोजी कोप्पळ (कर्नाटक) येथे आयोजित ‘कवी गविसिद्ध एन. बळ्ळारी साहित्योत्सवा’मध्ये होणार आहे. Publication of Kannada translation of Chimborey War

या कन्नड आवृत्तीचा अनुवाद प्रकाश पर्वतीकर (तामिळनाडू) यांनी केला असून सर्वभाषा पब्लिकेशन, नवी दिल्ली यांच्या वतीने ही कादंबरी प्रकाशित करण्यात आली आहे. कन्नड साहित्य अकादमी पुरस्कारविजेते ज्येष्ठ साहित्यिक अल्लमप्रभू बेट्टदूर यांच्या हस्ते कादंबरीचे प्रकाशन होणार आहे. या वेळी प्रसिद्ध लेखिका प्रतिमा इंगोले आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बसवेश्वर चेणगे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. Publication of Kannada translation of Chimborey War

Publication of Kannada translation of Chimborey War

कार्यक्रमाचे आयोजन डॉ.महेश बेल्लारी, डॉ. संजय बोरुडे, रचना, समन्वयक सुजाता भोजणे, यांनी केले आहे. कादंबरी भाष्य कवी व प्राध्यापक महेश बेल्लारी, कोप्पळ हे भाष्य करणार आहेत. तसेच निर्मला शेट्टर, पप्पू गुरु, राधा कुलकर्णी, अमरेश पूजारी, एन. सी. हिरेमठ आणि शिल्पा गळ्ळी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. Publication of Kannada translation of Chimborey War

‘चिंबोरे युद्ध’ ही कादंबरी मराठीत अथर्व पब्लिकेशन, जळगाव यांनी प्रकाशित केली आहे. या कादंबरीला राज्यस्तरावरील विविध साहित्यिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही तिचा समावेश आहे. कादंबरीच्या मराठी आवृत्तीच्या मलपृष्ठासाठी ज्ञानपीठ पुरस्कारविजेते ज्येष्ठ साहित्यिक श्री. दामोदर मावजो यांनी मजकूर लिहिला आहे. Publication of Kannada translation of Chimborey War

या कादंबरीचा हिंदी अनुवाद प्रसिद्ध अनुवादक डॉ. गोरख थोरात यांनी केला असून हिंदी साहित्यविश्वात या अनुवादाची चर्चा होत आहे. याशिवाय कादंबरीचे इंग्रजी, बंगाली आणि गुजराती भाषांमधील अनुवादाचे कामही सुरू आहे. त्यामुळे ‘चिंबोरे युद्ध’चा प्रवास मराठीपुरता मर्यादित न राहता विविध भारतीय भाषांमध्ये होत आहे. Publication of Kannada translation of Chimborey War

प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांची आतापर्यंत २१ पुस्तके प्रकाशित झाली असून राष्ट्रीय व राज्यस्तरावरील ४० पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. त्यांच्या साहित्यलेखनात प्रयोगशीलता, सामाजिक वास्तव, मानवी जीवनानुभव आणि विविध साहित्यप्रकारांतील अभिव्यक्ती यांचे दर्शन घडते. Publication of Kannada translation of Chimborey War

मराठीतील पुरस्कारप्राप्त आणि विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या ‘चिंबोरे युद्ध’ या कादंबरीचा कन्नड अनुवाद कन्नड वाचकांसमोर येणे हा मराठी-कन्नड साहित्यिक संवादाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. कोप्पळ येथे होणारा हा प्रकाशन सोहळा साहित्यप्रेमी आणि कन्नड साहित्यविश्वासाठी विशेष आकर्षणाचा ठरणार आहे. Publication of Kannada translation of Chimborey War

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPublication of Kannada translation of Chimborey Warटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share16SendTweet10
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.