• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महिला तक्रारी सोडवणुकीसाठी जनसुनावणी

by Manoj Bavdhankar
December 12, 2024
in Ratnagiri
96 0
0
Public Hearing for Women's Grievance
188
SHARES
536
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 12 : जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारींचे स्थानिक स्तरावर सोडवणूक करण्यासाठी बुधवार दि. 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवन, तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार  येथे जनसुनावणीचे आयोजन केली आहे. या जनसुनावणीस आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर स्वतः उपस्थित राहणार आहेत. तरी या जनसुनावणीस पिडीत असलेल्या, समस्या व तक्रारी असणाऱ्या जास्तीत जास्त महिलांनी सुनावणीस सहभाग घेऊन आपल्या समस्या मांडाव्यात,  असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, रत्नागिरी यांनी केलेले आहे. Public Hearing for Women’s Grievance

महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांचे कार्यालय मुंबई येथे असल्याने राज्यातील अनेक महिलांना मुंबई येथे पोहोचणे शक्य होत नाही. महिलांना त्यांच्या तक्रारी/समस्या बाबत स्थानिक स्तरावर आपले म्हणणे मांडण्याकरीता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा  रुपालीताई चाकणकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार “महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमाद्वारे जिल्हयातील महिलांच्या तक्रारीची स्थानिक स्तरावर सोडवणूक करण्यासाठी जनसुनावणीचे आयोजन केली आहे. या जनसुनावणीस आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर स्वतः उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तसेच विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास, कोकण, मुंबई विभाग हे देखील उपस्थित राहणार आहेत. Public Hearing for Women’s Grievance

या जनसुनावणीमध्ये ०३ स्वतंत्र पॅनल तयार करण्यात येणार असून प्रत्येक पॅनलमध्ये सदस्य म्हणून विधी व न्याय प्राधिकरणाचे वकील, संरक्षण अधिकारी, पोलीस अधिकारी, समुपदेशक, महिला व मुलांचे सहाय्य कक्ष, पोलीस अधिकारी, सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. यापॅनलव्दारे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे विभागीय कार्यालय कोकण, मुंबई येथे  जिल्हयाच्या प्राप्त तक्रारी व इतर सेवाभावी संस्थेचे समुपदेशन केंद्र यांच्याकडील प्रकरणांचे तसेच ऐनवेळी येणाऱ्या पिडीत महिलांचे तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे.  Public Hearing for Women’s Grievance

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarPublic Hearing for Women's GrievanceUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share75SendTweet47
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.