गुहागरात निषेध मोर्चा, भारत सरकारला केली विनंती
गुहागर, ता. 10 : बांगलादेशातील हिंदूवर होणारे अत्याचार आणि मंदिरावर होणारे हल्ले थांबविण्यासाठी भारत सरकारने बांगलादेश सरकारवर दबाब आणावा. या मागणीसाठी आज गुहागरमध्ये विश्र्व हिंदू परिषदेतर्फे मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मुक मोर्चाला सुरवात झाली. तहसीलदार कार्यालयासमोर मोर्चाचा समारोप झाला. यावेळी राष्ट्रपतींना देण्यासाठीचे निवेदन पाच प्रतिनिधींनी गुहागरच्या तहसीलदारांना दिले. Protest march in Guhagar
तहसीलदार कार्यालयासमोर या मोर्चाला संबोधित करताना विश्र्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांत सहमंत्री अनिऋध्द भावे म्हणाले की, जागतिक मानवाधिकार आयोग हिंदुंवरील अन्यायाविरोधात जागे करावे लागते ही दुर्देवी गोष्ट आहे. खरतर भारतातातील हिंदुंना मानवाधिकार शिकविण्याची गरज नाही. सहिष्णू हिंदुंनी भारतामध्ये शक, हुणांपासून, पारशी, मुसलमान, ख्रिश्चन या सर्वांना या देशात, येथील संस्कृतीत सामावून घेतले. परंतु या सर्वांवर अत्याचार झाल्यावर मानवाधिकार आयोगाचे लोक गळा काढुन रडतात परंतू हिंदूंवर झालेल्या अत्याचाराविरोधात मानवाधिकाराचे काम करणाऱ्या संस्थांचे कार्यकर्ते आवाज उठवत नाहीत. ओरीसामध्ये ख्रिश्चन धर्मगुरु ग्रॅहम स्टेन धाकधपडशा करुन धर्मांतर घडवायचा. असंतोषातून याची हत्या झाली. त्याविरोधात मानवाधिकार आयोग गळा काढुन रडत होता. मात्र त्याच ओरीसामध्ये स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांच्या आश्रमात घुसून ख्रिश्चन मिशनरी आणि कम्युनिस्टांनी हत्या केली. त्यावेळी मानवाधिकाराचा आवाज निघाला नाही. आज बांग्लादेशमध्येही हेच सुरु आहे. खरतरं भारतामुळे बांग्लादेशाची निर्मिती झाली. परंतु आज तेथील जनता भारताचे हे उपकारच विसरली आहे. बांग्लादेशमध्ये आलेल्या महापुराच्या वेळी दररोज 30 हजार लोकांना अन्नदान करताना इस्कॉनच्या कार्यकर्त्यांनी धर्म पाहीला नाही. मात्र आज त्याच इस्कॉनच्या स्वामी चिन्मयानंद आणि इस्कॉनच्या अन्य कार्यकर्त्यांना बांग्लादेशाने अटक केली आहे. जुलै 2024 पासून बांग्लादेशातील अंतर्गत वादात तेथे रहात असलेला अल्पसंख्याक हिंदू समाज बळी पडत आहे. अनेक हिंदु मंदिरे जाळली जात आहेत. हिंदू लोकांना मारले जात आहे. हिंदू महिला, तरुणींवर अत्याचार होत आहेत. याच्या निषेधार्थ आज भारतातील हिंदु समाज रस्त्यावर उतरला आहे. आमची मागणी आहे की, भारत सरकारने तातडीने बांगलादेशमधील सरकारवर दबाव आणून हे विषय थांबवावेत. अन्यथा बेकायदेशीरपणे भारतात रहाणाऱ्या बांगलादेशीयांना हिंदू समाज शोधुन काढेल आणि त्यांना बांगलादेशात परत पाठविल्याशिवाय रहाणार नाही. Protest march in Guhagar
या मूक मोर्चामध्ये भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू, शिवसेनेचे नेते राजेश बेंडल, दिपक कनगुटकर, मनसेचे विनोद जानवळकर, निलेश सुर्वे, विश्र्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री बबन कुंभार, गौरव वेल्हाळ, डॉ. श्रीकृष्ण बेलवलकर, गुहागरच्या ग्राम देवस्थानचे अध्यक्ष शरद शेटे, वारकरी संप्रदायाचे प्रमुख मोहन संसारे, माजी नगराध्यक्षा स्नेहा वरंडे, सागरी सीमा मंचचे प्रांत कार्यकर्ते मयुरेश पाटणकर, राजन दळी, संघाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा संघचालक भाई टोपरे, धर्मजागरणचे विभाग संयोजक विवेक गानू, प्रशांत शिरगांवकर यांच्यासह विविध ज्ञाती, संप्रदायामधील 500 ग्रामस्थ उपस्थित होते. Protest march in Guhagar