• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 July 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्ह्यात 429 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

by Guhagar News
April 12, 2024
in Ratnagiri
124 2
0
Prohibitory action against 429 people
244
SHARES
698
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 12 : आचारसंहितेनंतर प्रतिबंधात्मक कारवाईंवर अधिक भर देण्यात आला आहे. आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात 429 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून १५९ जणांना अजामीनपात्र नोटीसा बजावण्यात आल्या आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील तिघांना तडिपार करण्यात आले आहे. अंमली पदार्थांचे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. Prohibitory action against 429 people

निवडणुकीशी संबंधित गुन्हे दाखल करण्यावर अधिकाधीक भर दिला जात आहे. अवैध दारूधंद्यांवर कारवाई सुरू आहेत. या कालावधीत १११ छापे टाकण्यात आले असून त्यातून लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ९३ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात ९ लाख ४२ हजार ६७८ किंमतीची १०४७ लिटर हातभट्टीची दारू, ७३.४८ लिटर विदेशी दारू, ४२.४८ लिटर देशी दारू तसेच रसायन जप्त करण्यात आले आहे. तसेच अजामीनपात्र नोटीस बजावण्यावरही भर देण्यात येत आहे. पाहिजे असलेले आणि फरीरी असलेले आरोपी यांची शोध मोहीम सुरू आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने चिपळुणातील एक आणि रत्नागिरीशहरातील दोन अशा एकूण तीन जणांना तडिपार करण्यात आले आहे. अजुनही जे प्रस्ताव प्रलंबित आहेत, त्याचा पाठपुरावा करण्यात येत असल्याचे पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले. Prohibitory action against 429 people

लोकांच्या मनात विश्वास निर्माण व्हावा, कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चांगली आहे. त्यामुळे सर्वांनी न भिता मतदानाचा हक्क बजावावा, या उद्देशाने रत्नागिरी, चिपळूण, दापाेली आदी शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागामध्येही पोलिसांचे पथसंचलन सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण भागातही असेच पथसंचलन करण्यात येईल, असेही पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघात १९ मार्च रोजी कणकवली मतदार संघात १० लाख आणि २५ मार्च रोजी सावंतवाडी मतदार संघात ४ लाख अशी एकूण १४ लाख रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. या दोन्ही मतदार संघात मिळून १ कोटी १३ लाख ५८ हजार ३५० रूपये किंमतीची १६ लाख ३०० लिटर दारू जप्त करण्यात आली. तसेच या कालावधीत १७०० रूपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. Prohibitory action against 429 people

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarProhibitory action against 429 peopleUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share98SendTweet61
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.