संदेश कदम, आबलोली
गुहागर,ता. 30 : रत्नागिरी जिल्हा शिवसेना प्रणित रिक्षा, टॅक्सी व विद्यार्थी वाहतूक सेना पुरस्कृत रिक्षा व्यावसायिक चालक मालक संघटना आबलोली, तालुका गुहागर यांच्या वतीने प्रतिवर्षा प्रमाणे नुतन वर्षाच्या प्रारंभी बुधवार दिनांक ०१ जानेवारी २०२५ रोजी विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Program organized by Rickshaw Drivers Owners Association
यावेळी स. ०८ वाजता श्री. सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. स. ०९ वाजता महाआरती व तिर्थप्रसाद, स. ११ वाजता अधिकृत रिक्षा थांब्याचे मान्यवरांचे हस्ते उदघाटन, तर सायंकाळी ०७ वाजता आबलोली – खोडदे गावातील स्थानिक मंडळांचे सुस्वर भजन आयोजित करण्यात आले आहे. रात्रौ ०९ वाजता लकी ड्रॉ सोडतीचा भाग्यवान विजेत्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर रात्रौ १० वाजता संगमेश्वर तालुक्यामधील श्री. ग्रामदेवता लोककला नाट्य – नमन मंडळ यांचे बहुरंगी बहूढंगी नमन सादर करण्यात येणार असून “सैतानी डाव” अर्थात “गनिमी कावा” हे वगनाट्य सादर होणार आहे. Program organized by Rickshaw Drivers Owners Association


तरी या संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन रिक्षा व्यावसायिक चालक मालक संघटना आबलोली या संघटनेचे अध्यक्ष सुभाष कदम, उपाध्यक्ष गोपीनाथ शिर्के, कोषाध्यक्ष अनिल साळवी, सचिव अजित मोहिते, सह.सचिव प्रशांत कदम, सल्लागार प्रविण भंडारी, धनदिप साळवी, प्रकाश चाचे, दौलत शिर्के, दिनेश पागडे, सदस्य योगेश साळवी, तुषार भोजने, समीर चाचे, मंगेश मास्कर, अमित निवाते, सर्वेश पवार, संदिप दिवेकर, मनोज भोजने, दत्ताराम साळवी, मनोज पवार, अमित करंजकर, प्रशांत गोणबरे, प्रशांत सुर्वे, राजेश मोहिते, ऋषिकेश झगडे, निरंजन सुर्वे, सागर चव्हाण यांनी केले आहे. Program organized by Rickshaw Drivers Owners Association