मनसे चे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष यांच्या वतीने शीतपेयेचे वाटप
गुहागर, ता. 19 : तालुक्यातील शृंगारतळी येथे सोमवारी मुस्लिम बांधवाच्यावतीने सर्वत्र ईद ए मिलादुन्नबी सण साजरा करण्यात आला. यावेळी मजलिसे कबुलुल्लाह हुसैनी कमिटीच्या वतीने वेळंब फाटा ते पालपेणे फाट्यापर्यंत शृंगारतळी बाजारपेठेत ईद – ए -मिलादुन्नबी सणानिमित्त मिरवणूक काढण्यात आली. Procession on the occasion of Eid-e-Miladunnabi
गेले अनेक वर्षे ईद – ए – मिलादुन्नबी सणानिमित्त मिरवणूक काढण्यात येते. यामध्ये हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतिक पहायला मिळते. या मिरवणुकीमध्ये शृंगारतळीचा राजा गणेशोत्सव मंडळातर्फे शितपेय व पाणी बॉटल यांचे वाटप केले गेले व शुभेच्छा दिल्या गेल्या. या मिरवणुकीमध्ये सर्व जाती धर्मातील नागरीक सहभागी झाले होते. शृंगारतळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वतीने मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या सर्वांनी तसेच बाजारपेठेतील व्यापारी, नागरीक ग्राहक या सर्वांना लस्सीचे वाटप करण्यात आले. Procession on the occasion of Eid-e-Miladunnabi


यावेळी मजलिसे कबुलुल्लाह हुसैनी कमिटीच्यावतीने मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद शेठ गांधी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर गुहागर शहर अध्यक्ष नवनाथ साखरकर व इतर पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे शृंगारतळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचेही आभार मानण्यात आले. Procession on the occasion of Eid-e-Miladunnabi
सदर मिरवणूक वेळंब रोड मदरसा येथून बाजारपेठ मार्गे पालपेणे फाटा येथून श्रृंगारतळी पेट्रोल पंप या मार्गे जाऊन पुन्हा वेळंबरोड मदरसा येथे सांगता करण्यात आली. या मिरवणुकीसाठी मजलिसे कबुलुल्लाह हुसैनी कमिटीने मेहनत घेतली. यावेळी गुहागर पोलिसांनी पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता. मजलिसे कबुलुल्लाह हुसैनी कमिटीचे अध्यक्ष गफार मेमन यांच्याकडून त्यांचेही स्वागत करण्यात आले. Procession on the occasion of Eid-e-Miladunnabi