• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शृंगारतळीत ईद-ए-मिलादुन्नबी सणानिमित्त मिरवणूक

by Manoj Bavdhankar
September 19, 2024
in Guhagar
181 4
0
Procession on the occasion of Eid-e-Miladunnabi
359
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मनसे चे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष यांच्या वतीने शीतपेयेचे वाटप

गुहागर, ता. 19 : तालुक्यातील शृंगारतळी येथे सोमवारी मुस्लिम बांधवाच्यावतीने सर्वत्र ईद ए मिलादुन्नबी सण साजरा करण्यात आला. यावेळी मजलिसे कबुलुल्लाह हुसैनी कमिटीच्या वतीने वेळंब फाटा ते पालपेणे फाट्यापर्यंत शृंगारतळी बाजारपेठेत ईद – ए -मिलादुन्नबी सणानिमित्त मिरवणूक काढण्यात आली. Procession on the occasion of Eid-e-Miladunnabi

गेले अनेक वर्षे ईद – ए – मिलादुन्नबी सणानिमित्त मिरवणूक काढण्यात येते. यामध्ये हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतिक पहायला मिळते. या मिरवणुकीमध्ये शृंगारतळीचा राजा गणेशोत्सव मंडळातर्फे शितपेय व पाणी बॉटल यांचे वाटप केले गेले व  शुभेच्छा दिल्या गेल्या. या मिरवणु‌कीमध्ये सर्व जाती धर्मातील नागरीक सहभागी झाले होते. शृंगारतळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना  गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वतीने मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या सर्वांनी तसेच बाजारपेठेतील व्यापारी, नागरीक ग्राहक या सर्वांना लस्सीचे वाटप करण्यात आले. Procession on the occasion of Eid-e-Miladunnabi

यावेळी मजलिसे कबुलुल्लाह हुसैनी कमिटीच्यावतीने मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद शेठ गांधी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर गुहागर शहर अध्यक्ष नवनाथ साखरकर व इतर पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे शृंगारतळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचेही आभार मानण्यात आले. Procession on the occasion of Eid-e-Miladunnabi

सदर मिरवणूक वेळंब रोड मदरसा येथून बाजारपेठ मार्गे पालपेणे फाटा येथून  श्रृंगारतळी पेट्रोल पंप या मार्गे जाऊन पुन्हा वेळंबरोड मदरसा येथे सांगता करण्यात आली. या मिरवणुकीसाठी मजलिसे कबुलुल्लाह हुसैनी कमिटीने मेहनत घेतली. यावेळी गुहागर पोलिसांनी पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता. मजलिसे कबुलुल्लाह हुसैनी कमिटीचे अध्यक्ष गफार मेमन यांच्याकडून त्यांचेही स्वागत करण्यात आले. Procession on the occasion of Eid-e-Miladunnabi

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarProcession on the occasion of Eid-e-MiladunnabiUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share144SendTweet90
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.