संपूर्ण कार्यकारिणीची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड
गुहागर, ता. 11 : रत्नागिरी सिंधुदुर्ग ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संघटना तालुका गुहागरच्या अध्यक्षपदी सुशिल परिहार यांची सन २०२५ वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच संपूर्ण कार्यकारिणीची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. President Sushil Parihar of Talathi Association
गुहागर येथील तलाठी भवन येथे रत्नागिरी सिंधुदुर्ग ग्राम महसूल अधिकारी(तलाठी) संघटना तालुका गुहागरची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये मागील सर्व कार्यकारिणीचीच बिनविरोध निवड करण्यात आली. या कार्यकारणीमध्ये अध्यक्षपदी सुशिल शंकर परिहार, उपाध्यक्षपदी निलेश नाना पाटील, सचिव पदी शुभम पुंजाजी जाधव, खजिनदारपदी सचिन रामेश्वर शिंदे, सल्लागारपदी मंडळ अधिकारी सर्व ( ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संवर्ग यांची निवड करण्यात आली. President Sushil Parihar of Talathi Association
या सभेला गुहागर मंडळ अधिकारी प्रिती रेवाळे, हेदवी मंडळ अधिकारी, संतोष सावर्डेकर, आबलोली मंडळ अधिकारी आनंद काजरोळकर, पालशेत मंडळ अधिकारी प्रशांत कानिटकर, ज्येष्ठ ग्राम महसूल अधिकारी दीपक ताटेवाड, सर्व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते. President Sushil Parihar of Talathi Association