गुहागर, ता. 22 : कोपरी विरार पूर्व येथे रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी दोडवली प्रीमियम लीग स्पर्धा जल्लोषात पार पडल्या. या स्पर्धेमध्ये एकूण संघ 8 संघांनी सहभाग घेतला होता. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ग्रामदेवतेचे श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक स्वामी समर्थ माऊली क्रिकेट संघ तर दुसरा क्रमांक माऊली ११ क्रिकेट संघ आणि तिसरा क्रमांक शिवतेज क्रिकेट संघ यांनी पटकावला. Premium league tournament organized by Dodvali
या स्पर्धेमध्ये शौर्य इलेव्हन क्रिकेट संघ, माऊली इलेव्हन क्रिकेट संघ, शिवतेज क्रिकेट संघ, स्वामी समर्थ माऊली संघ, टायगर इलेव्हन क्रिकेट संघ, स्वयंभू क्रिकेट संघ, ए वन क्रिकेट संघ, ध्रुवेश इलेव्हन क्रिकेट संघ या संघांचा समावेश केला होता. Premium league tournament organized by Dodvali
या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून दोडवळी गावचे अध्यक्ष शंकर जी कांबळे, उद्योजक मनसे पदाधिकारी सुरेंद्र निकम, ग्रामस्थ मंडळी यशवंत कांबळे, गणपत मोडेकर, यशवंतराव कांबळे, ज्ञानेश कांबळे, शाहीर गिरीश रनगडे, सचिन कांबळे, दत्ताराम गावणंग, मंगेश अवेरे, विठ्ठल हुमणे, निलेशजी कुळये, राज भडवलकर, नितीन करबेळे, रुची स्पोर्टचे मालक महेंद्र आयरे, विजय गोताड, दीपक मोरे, अवधूत कांबळे, विकास सावंत, विजय हुमणे, इतर मान्यवर तसेच रसिक क्रीडा प्रेमी आदी उपस्थित होते. Premium league tournament organized by Dodvali
या स्पर्धेसाठी अनेक हितचिंतक आणि दानशूर व्यक्तीने सढल हस्ते मदत केले याबाबत नागेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने आभार मानले. श्री रवींद्र मुरमुरे, श्री अशोक कांबळे, श्री दिनेश कांबळे, यांच्या विशेष सन्मान करण्यात आला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अशोक जी कांबळे, रवींद्र मुरमुरे, भरत हुमणे, संदीप निकम, दिनेश कांबळे, रमेश हुमणे, सर्वेश हुमणे, विठ्ठल पंडये, आणि अनेक खेळाडूंचे सहकार्य लाभले. या स्पर्धेचे समालोचन संदेश भडवलकर यांनी उत्कृष्ट रित्या पार पाडले. Premium league tournament organized by Dodvali