गुहागर, ता. 03 : तालुक्यातील मुंढर गावचे सुपुत्र प्रदिप अर्जुन गमरे यांची महाराष्ट्र पोलीस खात्यातील कर्तबगार आणि यशोमय कामगिरीमुळे त्यांची पोलिस उपनिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गमरे झालेल्या नियुक्तीमुळे मुंढर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. Pradeep Gamre as Sub Inspector of Police
प्रदिप गमरे यांची पोलिस खात्यात झुंझार पोलिस म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक गुन्ह्यांचा तपास उलगडून त्यांनी पोलिस खात्याचे नाव उज्वल केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, खेड, रामपूर, चिपळूण, सावर्डे या पोलिस स्थानकात यशस्वी कामगिरी केली आहे. अनेक गुन्ह्यांचा तपास करुन आरोपींना जेरबंद केलेआहे.तर सर्व सामान्यांच्या तक्रारी सोडवून न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. सद्या ते चिपळूण तालुक्यातील सावर्डे पोलिस स्थानकात कार्यरत आहेत. Pradeep Gamre as Sub Inspector of Police
पोलिस खात्यात रुजु झाल्यानंतर आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून असंख्य गुन्ह्यांची उकल केली आहे. पोलिस खात्यात सेवा सुरू झाल्यानंतर हवालदार, हेड कॉन्स्टेबल, पोलिस अमलदार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ते पोलिस उपनिरीक्षक असा त्यांचा यशोमय उज्वल प्रवास म्हणजे कर्तव्यात उत्तम जिद्दीचा दाखला आहे. अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात त्यांचा हातखंडा आहे. भेदक नजरेने आरोपी पकडण्याची त्यांची पद्धत असाधारण आहे त्यांच्या यशोमय प्रगल्भतेचा विजय म्हणून मागील वर्षी महाराष्ट्र पोलीस खात्यातील पोलिस महासंचालक पदकाने गौरविण्यात आले. Pradeep Gamre as Sub Inspector of Police