• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 May 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ग्रामपंचायत उमराठमध्ये जनजागृती प्रभात फेरी

by Mayuresh Patnakar
August 8, 2022
in Guhagar
17 0
0
Prabhat Ferry in Umrath
33
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 08 : केंद्र सरकारच्या वतीने देशाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत ग्रामपंचायत उमराठ आणि जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उमराठ न.१ च्या विद्यार्थ्यांनी शनिवार दि. ०६ आॅगस्ट २०२२ रोजी शालेय व्यवस्थापन कमिटी, ग्रामस्थ आणि पालक वर्गाच्या  सहकार्याने शाळेची दुसरी जनजागृती प्रभात फेरी शाळेपासून गावातील दत्त मंदिर गोरिवले वाडी, जालगावकर वाडी ते कदम वाडी (बौद्धवाडी) येथे काढण्यात आली होती. Prabhat Ferry in Umrath

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उमराठ नं.१ च्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरम, भारत माता की जय, जय जवान जय किसान, माझा  तिरंगा माझ्या मनाचा राजा, माझे घर माझी शान, माझा तिरंगा माझा अभिमान अशा घोषणा देत गावातील वाडीवस्ती दुमदुमून टाकली. Prabhat Ferry in Umrath

Prabhat Ferry in Umrath

या जनजागृती फेरीत ग्रामस्थ स्वप्रेरणेने सहभागी झाले होते. कदम वाडी येथील बौद्ध विहारात या फेरीचा समारोप झाला. त्यावेळी विद्यार्थींनी वारकरी किर्तनाद्वारे उपस्थितांपर्यंत घरोघरी तिरंगा उभारण्याचा संदेश पोचवला. या जनजागृती प्रभात फेरीचे नियोजन श्री अनिल अवेरे सर आणि शिक्षकवर्गाने केले तर समारोप मुख्याध्यापक श्री. प्रदीप रामाणे सर यांनी सर्वांचे आभार मानून केला. Prabhat Ferry in Umrath

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPrabhat Ferry in UmrathUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.