गुहागर, ता. 08 : केंद्र सरकारच्या वतीने देशाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत ग्रामपंचायत उमराठ आणि जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उमराठ न.१ च्या विद्यार्थ्यांनी शनिवार दि. ०६ आॅगस्ट २०२२ रोजी शालेय व्यवस्थापन कमिटी, ग्रामस्थ आणि पालक वर्गाच्या सहकार्याने शाळेची दुसरी जनजागृती प्रभात फेरी शाळेपासून गावातील दत्त मंदिर गोरिवले वाडी, जालगावकर वाडी ते कदम वाडी (बौद्धवाडी) येथे काढण्यात आली होती. Prabhat Ferry in Umrath

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उमराठ नं.१ च्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरम, भारत माता की जय, जय जवान जय किसान, माझा तिरंगा माझ्या मनाचा राजा, माझे घर माझी शान, माझा तिरंगा माझा अभिमान अशा घोषणा देत गावातील वाडीवस्ती दुमदुमून टाकली. Prabhat Ferry in Umrath

या जनजागृती फेरीत ग्रामस्थ स्वप्रेरणेने सहभागी झाले होते. कदम वाडी येथील बौद्ध विहारात या फेरीचा समारोप झाला. त्यावेळी विद्यार्थींनी वारकरी किर्तनाद्वारे उपस्थितांपर्यंत घरोघरी तिरंगा उभारण्याचा संदेश पोचवला. या जनजागृती प्रभात फेरीचे नियोजन श्री अनिल अवेरे सर आणि शिक्षकवर्गाने केले तर समारोप मुख्याध्यापक श्री. प्रदीप रामाणे सर यांनी सर्वांचे आभार मानून केला. Prabhat Ferry in Umrath

