महावितरणला गुहागर शहर शिवसेना उबाठा पक्षाचे निवेदन
गुहागर, ता. 28 : गुहागर बाजारपेठ सोनारवाडी जुने मच्छी मार्केट येथे ११ केव्ही वाहिनीवरती व्ही क्रॉस हा चुकीच्या पद्धतीने तारेने बांधून घेतलेला आहे. पावसाळ्यामध्ये तिथे अपघात होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन त्वरित दुरुस्ती करावी, अशा मागणीचे निवेदन गुहागर शहर शिवसेना उबाठा तर्फे महावितरण उपविभाग कार्यालयाला देण्यात आले. Possibility of accident due to 11 KV line
गुहागर शहरामध्ये साधारण आठवडाभर वोल्टेज हे कमी प्रमाणात येत आहे. याचा त्रास सर्वसामान्य नागरिक आणि बाजारपेठेमधील व्यवसायिकांना होत आहे. याकडे तात्काळ लक्ष द्यावे व वीज पुरवठा सुरळीत व्हावा. वरील विषयासंदर्भात वेळोवेळी निदर्शनात आणून देखील कोणतीही दखल घेतली गेली नाही. येणाऱ्या काळात यामुळे कोणताही अपघात घडून जीवितहानी व वित्तहानी झाल्यास त्याला महावितरण कंपनी सर्वस्वी जबाबदार राहील अशी सूचना देत येत्या दोन दिवसात योग्य ती कार्यवाही न केल्यास आम्हाला जनहितार्थ आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा या निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. Possibility of accident due to 11 KV line
यावेळी उबाठा शिवसेना गुहागर शहर प्रमुख सिद्धिविनायक जाधव, उपतालुकाप्रमुख जयदेव मोरे, युवासेना शहरप्रमुख राज विखारे, युवती सेना प्रमुख रूणाली बागकर, महिला उपशहर संघटिका श्रीमती प्रीती वराडकर, विभाग प्रमुख विलास नार्वेकर, संतोष गुहागरकर, समीर कानगुटकर, शाखाप्रमुख कल्पेश बागकर, शिवसेना ग्राहक कक्ष तालुकाध्यक्ष आदेश मोरे, ज्येष्ठ शिवसैनिक प्रभुनाथ देवळेकर, शिवसैनिक निखिल विखारे, महेश घाडगे आदी उपस्थित होते. Possibility of accident due to 11 KV line