रत्नागिरी, ता. 23 : विधानसभा 2024 निवडणुका अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे, त्यामुळे सर्वांनी तिचे काटेकोरपणे पालन करावे त्याचप्रमाणे सोशल मीडियावरती कोणत्याही प्रकारची एखाद्या व्यक्तीची मानहानी अपमान त्याचप्रमाणे जातीय धार्मिक तेढ निर्माण होईल, अशा पोस्ट कोणीही टाकू नये. पोलीस विभागाच्या सायबर शाखेतर्फे प्रसारित होणाऱ्या सर्व व्हाट्सअप व इतर माध्यमातून प्रसारित होणाऱ्या पोस्ट यावर लक्ष ठेवण्यात आलेले असून जो कोणी वादग्रस्त व वरील प्रमाणे पोस्ट टाकून त्यामुळे वातावरण खराब होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करेल अशा व्यक्तीविरुद्ध पोलीस विभागातर्फे अत्यंत कडक कारवाई करण्यात येत आहे. Police keep a watchful eye on social media
कोणतेही राजकीय व इतर गर्दी जमवणारे कार्यक्रम असतील तर पोलीस विभाग व निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत रत्नागिरी यांच्या परवानगीशिवाय घेण्यात येऊ नयेत. तरी सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांनी केले आहे. Police keep a watchful eye on social media