पाच नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
गडचिरोली, ता. 23 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळून लावण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगलात नक्षलवादी व जवानात झालेल्या जोरदार चकमकीत पाच नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. चकमकीत एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. Police gave Naxalites a chokehold


छत्तीसगड सीमेवरील भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगलात गडचिरोली पोलिसांचे पथक जंगल परिसरात पोहोचताच माओवाद्यांनी पोलीस पथकाच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस पथकाकडून माओवाद्यांना शस्त्र खाली टाकून शरण येण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु, माओवाद्यांनी शरण न येता पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार सुरू ठेवला. गोळीबाराला प्रत्युत्तर देताना पोलीस पथकाकडून दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार करावा लागला, या अभियानात 05 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले झाले. जंगल परिसरात शोधमोहीम सुरू असून मृत माओवाद्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे. Police gave Naxalites a chokehold
दोन वेगवेगळ्या ठिकाणी ही चकमक झाली. यावेळी एक जवानही जखमी झाला आहे. जखमी जवानाला हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणले. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, मृत पाच नक्षलवाद्यांचे मृतदेह देखील गडचिरोली येथे आणले आहेत. त्यांची ओळख पटविण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. Police gave Naxalites a chokehold