समृद्धी गोवळकर, मुग्धा सुर्वे व आदित्य घाणेकर स्पर्धेत प्रथम
गुहागर, ता. 27 : गुहागर तालुका मराठी भाषा मंडळातर्फे स्वरचित काव्य लेखन तालुकास्तरीय स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत प्राथमिक गटात समृद्धी योगेश गोवळकर, मुग्धा देवेंद्र सुर्वे व उच्च माध्यमिक गटात आदित्य महेश घाणेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. Poetry writing competition
गुहागर तालुका मराठी भाषा मंडळातर्फे गुहागर तालुकास्तरीय स्वरचित काव्य लेखन स्पर्धा प्राथमिक गट – इयत्ता पाचवी ते सातवी , माध्यमिक गट – इयत्ता आठवी ते दहावी व उच्च माध्यमिक – इयत्ता अकरावी व बारावी या तीन गटात न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात नुकतीच संपन्न झाली. प्राथमिक गटासाठी आई-वडील व गुरुजन , माध्यमिक गटासाठी निसर्ग वर्णन व उच्च माध्यमिक गटासाठी सामाजिक जाणीव या विषयांवर स्वरचित काव्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या तिन्ही गटांमध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. Poetry writing competition
प्राथमिक गटात प्रथम क्रमांक – समृद्धी योगेश गोवळकर (इयत्ता पाचवी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आबलोली, द्वितीय क्रमांक – समृद्धी संदीप दुसार (सातवी) सरस्वती विद्यामंदिर जामसूत व तृतीय क्रमांक – सिया नयन कुरधुंडकर (पाचवी) श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर,
माध्यमिक गटात प्रथम क्रमांक – मुग्धा देवेंद्र सुर्वे (नववी) माध्यमिक विद्यालय कुडली परिसर, द्वितीय क्रमांक – स्वराज सुभाष शितप (आठवी) ग. ज. तथा तात्या वझे विद्यामंदिर पाचेरीआगर, तृतीय क्रमांक – अश्विनी आनंदा दोलतडे (नववी) सरस्वती विद्यामंदिर जामसूत
उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक – आदित्य महेश घाणेकर (अकरावी) न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे, द्वितीय क्रमांक – पुर्वा मनोज मयेकर (अकरावी) दु. ह. वैद्य माध्यमिक व भा. सु. पाटील ज्युनिअर कॉलेज अंजनवेल व तृतीय क्रमांक – सृष्टी शशिकांत राणे (अकरावी) दु. ह. वैद्य माध्यमिक व भा.सु. पाटील ज्युनिअर कॉलेज अंजनवेल यांनी संपादित केला. Poetry writing competition
सदर गुहागर तालुकास्तरीय स्वरचित काव्य लेखन स्पर्धेच्या गौरव समारंभाचे अध्यक्षपद गुहागर तालुका मराठी भाषा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष एस.बी चांदिवडे यांनी भूषविले. प्रमुख मान्यवर म्हणून रत्नागिरी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीम. सुवर्णा सावंत, रत्नागिरी जिल्हा प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता श्रीम. काणे, पाटपन्हाळे विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. डी. पाटील, संघटनेचे सल्लागार व गुहागर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एम.डी. गोरीवले, परीक्षक डॉ. बाळासाहेब लबडे, डॉ. जालिंदर जाधव, संघटनेचे सल्लागार व मुंढर हायस्कूलचे मुख्याध्यापक ए. एच. साठे, संघटनेच्या उपाध्यक्षा सौ. एस. एस. चव्हाण, उपाध्यक्ष पी. बी. जाधव, सचिव एस. एम. आंबेकर, सहसचिव ए. एम. दोलतडे, खजिनदार पी. आर. वैद्य, संघटनेचे सदस्य पी. व्ही. साळुंके, व्ही. व्ही. पवार , एस. वाय. भिडे, श्रीम. एन. एस. वाघे व पाटपन्हाळे ज्युनिअर कॉलेजच्या प्रा. श्रीम. एम. एस. जाधव उपस्थित होते. स्पर्धेच्या परीक्षणासाठी गुहागर वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व साहित्यिक डॉ. बाळासाहेब लबडे, पाटपन्हाळे वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. डॉ. जालिंदर जाधव यांचे योगदान लाभले. Poetry writing competition
यावेळी उपस्थित असलेले रत्नागिरी माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीम. सुवर्णा सावंत, रत्नागिरी जिल्हास्तरीय प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता श्रीम. काणे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थी कवी यांना चषक, प्रमाणपत्र देऊन तसेच स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी कवी यांना प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. गौरव समारंभानिमित्त सरस्वती विद्यामंदिर जामसूतची विद्यार्थिनी अश्विनी आनंदा दोलतडे हिने निसर्ग वर्णनपर कविता सादर केल्याबद्दल मान्यवरांनी सहभागी विद्यार्थी कवी यांचे अभिनंदन केले. गुहागर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गोरीवले, संघटनेचे खजिनदार पी. आर. वैद्य , पी. व्ही. साळूंके आदी मान्यवरांनी मनोगतातून स्पर्धा आयोजक, सहभागी विद्यार्थी व यशवंत विद्यार्थी कवी यांचे अभिनंदन करून स्पर्धेबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाध्यक्ष व गुहागर तालुका मराठी भाषा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष एस. बी. चांदिवडे यांनी स्वरचित काव्य लेखन स्पर्धेसाठी गुहागर तालुक्यातील मुख्याध्यापक व शिक्षक तसेच विद्यार्थी यांनी चांगले सहकार्य केले. Poetry writing competition