• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राज्यस्तरीय निबंध व कविता लेखन स्पर्धा

by Guhagar News
April 1, 2024
in Articals
136 2
1
Poetry writing competition
268
SHARES
765
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

श्रमिक कृषी संवर्धन संस्था संचालित विलासजी होडे स्मृती वाचनालय, आरवली

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 01 : श्रमिक कृषी संवर्धन संस्था संचालित मान. विलासजी होडे स्मृती वाचनालय आरवली, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि खुल्या गटात घेण्यात येणार आहेत. या निबंध व कविता दि. ५ एप्रिल २०२४ पर्यंत संबंधित परिक्षकांच्या मोबाईल नंबरवर पीडीएफ करुन पाठवावी. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे. असे जाहीर आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे. Poetry writing competition

या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांमधून १ ते ३ क्रमांक निवडून त्यांना रविवार दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी होणाऱ्या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये मान्यवरांचे हस्ते प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी स्पर्धकांनी आपले निबंध व कविता स्व हस्ताक्षरात लिहून श्रमिक कृषी संवर्धन संस्था संचालित विलासजी होडे स्मृती वाचनालय आरवली, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी पिनकोड ४१५६०८ या पत्त्यावर पाठवावेत. तसेच मुळ प्रत सुद्धा दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायची आहे. Poetry writing competition

गट क्र. १ इयत्ता ३ री ते ६ वी साठी
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण २) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शिक्षणासाठी संघर्ष ३) डॉ.बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांचे उद्धारकर्ते असे विषय ठेवण्यात आले असून यासाठी २५० ते ३०० शब्दांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. निबंध पीडीएफ स्वरुपात मो.नं. ९४२२९६५६३० पाठविण्यात यावेत. विजेत्या प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम ७००/- रुपये व प्रमाणपत्र, व्दितीय क्रमांकासाठी रोख रक्कम ५००/- रुपये व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम ३००/- रुपये व प्रमाणपत्र आदी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. Poetry writing competition

गट क्र २  इयत्ता ७ वी ते १० वी साठी
१)संविधानाचे शिल्पकार – डॉ. बाबासाहेब आंबेडकर २) डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे संघर्षमय व प्रेरणादायी जीवन ३) डॉ.बाबासाहेब आंबेडकर : विद्यार्थी आणि शिक्षण विचारसरणी या विषयांसाठी ४५० ते ५०० शब्दांची मर्यादा ठेवण्यात आली असून निबंध पीडीएफ स्वरुपात पाठविण्यासाठी  प्रा.मिलिंद कडवईकर मो.नं.९७६७५६८७९८ यांच्याशी संपर्क साधावा. विजेत्या प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम १०००/- रुपये व प्रमाणपत्र, व्दितीय क्रमांकासाठी रोख रक्कम ७००/- रुपये व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम ५००/- रुपये व प्रमाणपत्र आदी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. Poetry writing competition

गट क्र. ३ इयत्ता ११ वी ते पदवीधर साठी
१)आरक्षणाविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका २)कोकण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ३) ओबीसी प्रवर्ग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान यासाठी  ९०० ते १००० शब्दांची मर्यादा ठेवण्यात आली असून निबंध पीडीएफ स्वरुपात पाठविण्यासाठी प्रा.संदिप येलये मो.नं.७०३८२१२६०६ यांचेशी संपर्क साधावा. विजेत्या प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम १५००/- व प्रमाणपत्र, व्दितीय क्रमांकासाठी रोख रक्कम १२००/- रुपये व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम १०००/- रुपये व प्रमाणपत्र आदी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. Poetry writing competition

गट क्र.४ सर्वांसाठी खुला गट
१) डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींना काय दिले ? २) डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्री विषयक कार्य ३) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानाला अपेक्षित असलेला भारत या विषयांसाठी १२०० ते १५०० शब्द मर्यादा ठेवण्यात आली असून निबंध पीडीएफ स्वरुपात पाठवीण्यासाठी विलास डिके मो.नं.९४०३६३००३५ यांचेशी संपर्क साधावा. विजेत्या प्रथम क्रमांकसाठी रोख रक्कम २०००/- रुपये व प्रमाणपत्र, व्दितीय क्रमांकासाठी रोख रक्कम १५००/- रुपये व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम १२००/- रुपये व प्रमाणपत्र आदी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. Poetry writing competition

गट क्र.५ कविता लेखन
ओबीसी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर कविता लेखन करुन पीडीएफ स्वरूपात पाठवीण्यासाठी प्रा.संदिप येलये मो.न.७०३८२१२६०६ यांचेशी संपर्क साधावा. विजेत्या स्पर्धकाला रोख रक्कम १५००/- रुपये व प्रमाणपत्र, व्दितीय क्रमांकासाठी रोख रक्कम १२००/- रुपये व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम १०००/- व प्रमाणपत्र आदी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. Poetry writing competition

या स्पर्धेसाठी नियम व अटी

. स्पर्धेसाठी आपले निबंध किंवा कविता स्व हस्ताक्षरात लिहून दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायच्या आहेत तसेच त्याची पीडीएफ दिलेल्या हॉट्सअप नंबर दिनांक ५ एप्रिल २०२४ पर्यंत पाठवीणे आवश्यक आहे.
. निबंध किंवा कविता निबंध लेखनासाठी आखीव तावांचा वापर करायचा आहे. कागदाच्या एका बाजूला सुवाच्च अक्षरात लिहून पाठवायचे आहे.
. स्पर्धेसाठी आपल्या कविता किंवा निबंधात सोबत १ पेज सोडून त्यावर आपले नाव, शाळा, पत्ता, संपर्क मोबाईल नंबर, गट क्र. लिहायचा आहे
. कुठल्याही छापील किंवा प्रकाशीत लिखाणाशी निबंध किंवा कविता मिळता जुळता आढळल्यास निबंध किंवा कविता ग्राह्य धरता येणार नाही.
. निबंध किंवा कविता स्व हस्ताक्षरात फोटो पीडीएफ दिलेल्या हॉट्सअप नंबरवर काढून पाठवावा व निबंध किंवा कवितेची मुळ प्रत दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहे.
. प्रशिक्षकांनी दिलेला निकाल अंतिम असेल. यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली जाणार नाही.
. स्पर्धेत बदल करण्याचे अधिकार कमिटीचे असतील.
. स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
. या स्पर्धेला कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. Poetry writing competition

तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धेसाठी सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन श्रमिक कृषी संवर्धन संस्था संचालित मान.विलासजी होते स्मृती वाचनालय आरवली, तालुका संगमेश्वर या  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.विलास डिके मो.नं.९४०३६३००३५ / ८८०५७९३०७०, उपाध्यक्ष संतोष मोरे मो.न.९४०५७५६३१३, सचिव प्रदिप सोलकर मो.न.९४२२०१०९३७, खजिनदार रुपेश कुळ्ये मो.नं.८८०५२१०३१६, सदस्य मिलिंद कडवईकर मो.न.९७६७५६८७१८, विलास डिके मो.नं.९०२८७५५१३५, सदस्या वर्षा डिके ९४०५५०९६१९ यांनी केले आहे. Poetry writing competition

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarPoetry writing competitionUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share107SendTweet67
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.