“कविता काळजातल्या” बहारदार कार्यक्रम संपन्न
गुहागर, ता. 08 : महाराष्ट्र शासन निर्देशित “मराठी भाषा पंधरवडा” या उपक्रमांतर्गत मराठी कोकण साहित्य परिषद शाखा गुहागर व श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालय पालशेत यांच्या विद्यमाने दिनांक १ फेब्रुवारी 2025 रोजी “कविता काळजातल्या” हा कविता गायनाचा आणि वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोमसाप शाखा गुहागरचे कार्याध्यक्ष आणि खरे- ढेरे- भोसले कॉलेजचे मराठी विभागाचे प्रमुख तसेच ज्येष्ठ साहित्यिक डॉ.बाळासाहेब लबडे हे होते. त्यांच्यासोबत पालशेतचे कोमसाप शाखा गुहागर उपाध्यक्ष कविवर्य आनंदीतनय ऊर्फ श्री मोहन पाटील या कार्यक्रमास उपस्थित होते. Poetry singing event at Palshet


आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना अभिजात मराठी भाषा म्हणजे काय? व तिचे महत्त्व समजावून सांगितले. “आमच्याच भाषेणे कोन्चा काय केलाय” ही बहारदार कविता सादर केली. “ये सखये ये चांदराती” ही शृंगारीक कविता सादर केली. “भजनावली” भक्तीपर होती. या सारख्या आपल्या कविता सादर केल्या. डॉ बाळासाहेब लबडे यांनी विडंबनात्मक कविता म्हणजे काय हे स्पष्ट करून आपल्या काही विडंबन कविता सादर केल्या. यात “मित्र फुकटामध्ये बाटली सारखा”, “दिवस तुझे हे” ह्या कविता गाजल्या. वारीवरची आषाढातल्या दिवसांमधील ही सुंदर कविता रसिकांना भावली. विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमांमध्ये आपल्या काही कविता सादर केल्या. यामध्ये सार्थक नार्वेकर, प्राची कावणकर व मृणाली धावडे या विद्यार्थ्यांच्या कविता प्रेक्षकांना आवडल्या. पालशेत हायस्कूलचे विज्ञान शिक्षक श्री ढेंबरे सर यांनीही आपली कविता सादर केली. प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री. जोगळेकर सर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. Poetry singing event at Palshet

