‘मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रम
गुहागर, ता. 03 : पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली या प्रशालेत दि. 27 फेब्रुवारी 2025 रोजी ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ श्री. ज्ञानेश्वर झगडे यांच्या कविता वाचनाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मराठी विषयाच्या प्रा.सौ.जड्याळ मॅडम यांनी मराठी साहित्यावर आधारित प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन केले होते. Poetry reading by Zagade at Talwali College


गुहागर येथील जेष्ठ कवी श्री. ज्ञानेश्वर झगडे यांनी आपल्या स्वरचित कविता वाचून दाखविल्या. या कविता मनाला भिडणा-या, विचारमग्न व्हायला तसेच आत्मचिंतन करायला लावणा-या होत्या. त्यामध्ये आम्ही कोकणचे राजं, छप्पर सोन्याचं, माय बाप, स्वच्छता गीत या सारख्या एका पेक्षा एक कविता ऐकून विद्यार्थिही भारावून गेले होते. उस्फूर्तपणे टाळ्या वाजवून दादही देत होते. त्याबद्दल कवी ज्ञानेश्वर झगडे यांनी समाधान व्यक्त केले. Poetry reading by Zagade at Talwali College
यावेळी इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांनी प्रशालेचे माजी मुख्याध्यापक श्री. बी.ए.थरकार सर यांच्या ‘नवी पहाट’ या कविता संग्रहातील निवडक कवितांचे वाचन केले. कविता वाचन केलेल्या विद्यार्थिनींमध्ये कु.शर्वरी महेश शितप, कु. रिया रामचंद्र आंबेकर, कु.श्रावणी सोनू कळंबाटे, कु.दीक्षा धनेश दुर्गवले यांनी सहभाग घेतला. Poetry reading by Zagade at Talwali College


या प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक – कु.मनस्वी रवींद्र जोगळे, द्वितीय क्रमांक- कु.आकांक्षा दिलीप भुवड, तृतीय क्रमांक – कु.अनिश अंकुश जोगळे तर कु.शिवानी कैलास गुरव, कु.दीक्षा दिनेश पड्याळ, कु.रसिका प्रकाश डाकवे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावली. या स्पर्धेत सुयश प्राप्त विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे, सामान्यज्ञान वाढविणे व स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण करणे हा हेतू होता. या स्पर्धेत इयत्ता अकरावीचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांना मराठी विषयाच्या प्रा.सौ. जड्याळ मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. Poetry reading by Zagade at Talwali College
या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा.आयरे मॅडम यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रस्ताविक केले. जेष्ठ कवी ज्ञानेश्वर झगडे यांना प्राचार्य श्री.एम.ए.थरकार सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जड्याळ मॅडम यांनी केले. तर प्रा.अमोल जड्याळ सर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. Poetry reading by Zagade at Talwali College