गुहागर, ता. 25 : ज्ञानदा गुरुकुल पुणे व डॉ. तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान, मार्गताम्हाने यांच्या संयुक्त विद्यमाने, “प्लंबिंग तंत्रज्ञानाचे प्राथमिक कौशल्य प्रशिक्षण” दि. ०१ एप्रिल २०२५ पासून गुहागर तालुक्यातील मुंढर श्रीसिद्धिविनायक विद्यामंदिर येथे सुरू होत आहे. हे प्रशिक्षण एकूण ६० दिवसांचे असेल. त्यापैकी पहिले ३० दिवस मुंढर येथे आणि नंतरचे ३० दिवस ज्ञानदा गुरुकुल, पुणे, येथे हे प्रशिक्षण राबविले जाईल. प्रशिक्षणानंतर ज्ञानदा गुरुकुल, पुणे, यांचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. Plumbing Training in Mundhar Vidyamandir


आज देशभरात बांधकाम क्षेत्र हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. बांधकाम व्यवस्थित पूर्ण झाल्यावर दोन अशी कामे असतात, जी अचूकतेने केली गेली नाहीत तर होणारे नुकसान हे खूप मोठे आणि बऱ्याचदा आपल्या आयुष्यासाठी घातक ठरू शकते. एक म्हणजे वीजजोडणी आणि दुसरे म्हणजे नळजोडणी म्हणजेच प्लंबिंग, जर प्लंबिंग सदोष झाले तर पाणी गळती, भिंतींमध्ये पाणी झिरपून त्यांना बुरशी येणे, वीजेचा झटका बसणे आणि संपूर्ण घर किंवा इमारतीचा पाया खराब होण्यापर्यंत धोका उद्भवू शकतो. या समस्यांचा विचार करून आणि प्लंबिंगच्या कामातील दोष दूर करण्यासाठी, ज्ञानदा गुरुकुल ही संस्था गेली १४ वर्षे प्लंबिंग कौशल्य प्रशिक्षण देत आहे व उत्तम प्लंबर्स पडवित आहे. Plumbing Training in Mundhar Vidyamandir