• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुंढर विद्यामंदिरमध्ये प्लंबिंग कौशल्य प्रशिक्षण

by Ganesh Dhanawade
March 25, 2025
in Guhagar
91 1
0
Plumbing Training in Mundhar Vidyamandir
179
SHARES
510
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 25 :  ज्ञानदा गुरुकुल पुणे व डॉ. तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान, मार्गताम्हाने यांच्या संयुक्त विद्यमाने, “प्लंबिंग तंत्रज्ञानाचे प्राथमिक कौशल्य प्रशिक्षण” दि. ०१ एप्रिल २०२५ पासून गुहागर तालुक्यातील मुंढर श्रीसिद्धिविनायक विद्यामंदिर येथे सुरू होत आहे. हे प्रशिक्षण एकूण ६० दिवसांचे असेल. त्यापैकी पहिले ३० दिवस मुंढर येथे आणि नंतरचे ३० दिवस ज्ञानदा गुरुकुल, पुणे, येथे हे प्रशिक्षण राबविले जाईल. प्रशिक्षणानंतर ज्ञानदा गुरुकुल, पुणे, यांचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. Plumbing Training in Mundhar Vidyamandir

आज देशभरात बांधकाम क्षेत्र हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. बांधकाम व्यवस्थित पूर्ण झाल्यावर दोन अशी कामे असतात, जी अचूकतेने केली गेली नाहीत तर होणारे नुकसान हे खूप मोठे आणि बऱ्याचदा आपल्या आयुष्यासाठी घातक ठरू शकते. एक म्हणजे वीजजोडणी आणि दुसरे म्हणजे नळजोडणी म्हणजेच प्लंबिंग, जर प्लंबिंग सदोष झाले तर पाणी गळती, भिंतींमध्ये पाणी झिरपून त्यांना बुरशी येणे, वीजेचा झटका बसणे आणि संपूर्ण घर किंवा इमारतीचा पाया खराब होण्यापर्यंत धोका उद्भवू शकतो. या समस्यांचा विचार करून आणि प्लंबिंगच्या कामातील दोष दूर करण्यासाठी, ज्ञानदा गुरुकुल ही संस्था गेली १४ वर्षे प्लंबिंग कौशल्य प्रशिक्षण देत आहे व उत्तम प्लंबर्स पडवित आहे. Plumbing Training in Mundhar Vidyamandir

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarPlumbing Training in Mundhar VidyamandirUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share72SendTweet45
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.