गुहागर, ता. 27 : हायस्कूलमध्ये ओझोन दिन साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय ओझोन दिनानिमित्त श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, स. सु. पाटील विज्ञान, श्री महेश जनार्दन भोसले वाणिज्य व कै. विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. Plantation on International Ozone Day


यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुधाकर कांबळे, उपमुख्याध्यापक श्री. कोरके, पर्यवेक्षिका सौ. सुजाता कांबळे, पर्यवेक्षक श्री. मधुकर गंगावणे, विज्ञान शिक्षक श्री. गमरे, क्रीडा शिक्षक श्री. निलेश गोयथळे, एएनओ श्री. ढोणे, हरित सेना व एन.सी.सी कॅडेट्स उपस्थित होते. विज्ञान शिक्षिका सौ. कनगुटकर यांनी ओझोन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ओझोन दिन हा पर्यावरण संरक्षणासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. जर प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण केले तर ओझोन थराला नुकसान होण्यापासून वाचवता येईल. तसेच प्रशालेचे शालेय समिती अध्यक्ष श्री. दीपक कनगुटकर यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने हा उपक्रम पार पडला. Plantation on International Ozone Day

