• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 July 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रिगल कॉलेज शृंगारतळीमध्ये पिंड-दा-चस्का थीम डिनरला प्रतिसाद

by Guhagar News
December 9, 2024
in Guhagar
189 4
1
Pind-da-chaska theme dinner at Regal College
376
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 09 : रिगल एज्युकेशन सोसायटी संचलित रिगल कॉलेज शृंगारतळी मध्ये हॉटेल मॅनेजमेंट विभाग प्रस्तुत पिंड-दा-चस्का  पंजाबी थीम डिनरचे आयोजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पंजाबी संस्कृतीप्रमाणे  गुरुनानक पूजा व अंकित गांधी यांनी हरिदास म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. Pind-da-chaska theme dinner at Regal College

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.सचिन सावंत (पोलिस निरीक्षक,गुहागर), पवन कांबळे(पोलीस उपनिरिक्षक, गुहागर), श्री.साहिल आरेकर (अध्यक्ष, स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान,गुहागर),श्री. शामकांत खातू (मालक, अन्नपूर्णा हॉटेल, गुहागर), सौ.सुजाता बागकर (माजी सभापती, गुहागर), श्री. मुराद शेख (फ्रंट ऑफिस मॅनेजर, टीडब्लुजे), श्री.संतोष वरंडे(संचालक, लायन्स क्लब, गुहागर), श्री.विजय तेलगडे(सरपंच, ग्रामपंचायत पाटपन्हाळे), श्री.संजयराव शिर्के(अध्यक्ष, रिगल एज्युकेशन सोसायटी, चिपळूण), श्री.विराज दळी (संचालक, रिगल एज्युकेशन सोसायटी), महेश सुर्वे (संचालक, रिगल एज्युकेशन सोसायटी), श्री.दिनेश कदम (पालक प्रतिनिधी, रिगल कॉलेज, श्रृंगारतळी), श्री.अंकित गांधी (पंजाबी गेस्ट)उपस्थित होते. Pind-da-chaska theme dinner at Regal College

Pind-da-chaska theme dinner at Regal College

प्राचार्या सौ. मोरे मॅडम यांनी रिगल मध्ये असलेल्या विविध व्यवसायिक कोर्सेस ची माहिती दिली तसेच आतापर्यंत झालेल्या हॉटेल मॅनेजमेंट विभागातील विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के प्लेसमेंटची माहिती दिली. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचे त्यांनी कौतुक केले व आर्थिक तसेच वस्तुस्वरुपात हा कार्यक्रम पार पाडण्यास मदत केलेल्या सर्व दात्यांचे आभार मानले. यानंतर प्रा.सोनाली मिरगल यांनी पंजाबी थीम डिनरची माहिती दिली. आपल्या मनोगतामध्ये श्री.शामकांत खातू यांनी पंजाबी थीमबद्दलच्या डेकोरेशनचे कौतुक केले तसेच रिगल कॉलेजमध्ये झालेल्या रानभाजी स्पर्धेंतर्गत विद्यार्थ्यांनी केलेल्या नावीन्यपूर्ण पाककृतींचे कौतुक केले. श्री.साहिल आरेकर यांनी अशा पद्धतीचा थीम डिनर गुहागर येथे पर्यटनास वाव मिळण्यासाठी आयोजित करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. श्री विजय तेलगडे यांनी उत्तम प्रकारे नियोजन केल्याबद्दल कॉलेजचे आभार मानले. Pind-da-chaska theme dinner at Regal College

Pind-da-chaska theme dinner at Regal College

रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री शिर्के यांनी भाषणामध्ये आजची युवा पिढी ही संवेदनशील आहे हे सांगत रतन टाटा यांना फेसबुक, इंस्टाग्राम याद्वारे श्रद्धांजली पाहणाऱ्यांमध्ये जास्तीत जास्त युवा पिढीच होती असे सांगितले. रतन टाटा म्हटलं की विश्वास तसंच रिगल कॉलेज म्हटलं की रिगलचा विद्यार्थी सर्वगुणसंपन्न व शिस्तप्रिय असेल असेच विद्यार्थी घडविण्याचा विश्वास त्यानी व्यक्त केला. यावेळी विविध स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच  स्टुडन्ट ऑफ द इयर म्हणून हर्ष भुवड याला गौरविण्यात आले. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच डिनरचा बुफे ओपन करण्यात आला. Pind-da-chaska theme dinner at Regal College

Pind-da-chaska theme dinner at Regal College

सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पंजाबी भांगडा तसेच विविध पंजाबी बॉलीवूड डान्स व सुमधुर गाण्यांचा समावेश होता. डिनर मध्ये व्हेज व नॉनव्हेज स्टार्टर व मेन कोर्सचा समावेश होता यामध्ये बटर चिकन, रुमाली रोटी, पनीर बटर मसाला, पंजाबी स्टाईल चिकन मसाला, मिक्स व्हेज पकोडा, चिकन ६५ आदी पदार्थांचा समावेश होता. या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरलेल्या लकी ड्रॉ मध्ये टीव्ही, ओवन, इस्त्री तसेच इतर ५० बक्षिसांचा समावेश होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सोनाली मिरगल यांनी केले. या कार्यक्रमासाठी इव्हेंट इन्चार्ज म्हणून प्रा. विक्रम खैर तसेच स्टुडन्ट इन्चार्ज ऑफ द इव्हेंट म्हणून हर्ष भुवड याचे मार्गदर्शन लाभले. Pind-da-chaska theme dinner at Regal College

या कार्यक्रमासाठी रिगल कॉलेज, श्रृंगारतळीचे हॉटेल मॅनेजमेंटचे सर्व विद्यार्थी प्राध्यापक वर्ग तसेच सर्व सहकारी कर्मचारी उपस्थित होते. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. संजयराव शिर्के संचालिका डॉ.सुमीता शिर्के व रिगल कॉलेज, शृंगारतळीच्या प्राचार्या सौ.रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. Pind-da-chaska theme dinner at Regal College

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarPind-da-chaska theme dinner at Regal CollegeUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share150SendTweet94
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.