स्व-अवलोकनातूनसुरुहोतोव्यक्तिमत्वविकास; डॉ. दिवे
गुहागर, ता. 02 : शिरगाव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, शिरगाव व महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्युनिअर कॉलेज, शिरगाव येथील ११ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख प्रशिक्षक म्हणून महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयातील संभाषण कौशल्य विषयाचे प्राध्यापक डॉ. गणेश दिवे यांनी मार्गदर्शन केले. विविध क्रियाकलाप, गटचर्चा व खेळ यांच्या सहाय्याने अतिशय सोप्या पद्धतीने व्यक्तिमत्व विकास संकल्पनेचे विविध पैलू डॉ. दिवे यांनी मांडले. Personality Development Workshop


भौतिक, भावनिक, बौद्धिक, सामाजिक, मानसिक व अध्यात्मिक घटकांचा व्यक्तीमधील सुयोग्य मिलाप यास खऱ्या अर्थाने सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास म्हणतात, असे विद्यार्थ्यांनी जाणले. डॉ. दिवे यांनी विकास हि एक निरंतर प्रक्रिया असल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थांनी स्व-अवलोकनासाठी आपल्यातील चांगले गुण व कमजोरी यांचे लिखाण केले. त्याचबरोबर ध्येयनिश्चिती साठी नजीकची ध्येये, अल्पकालीन ध्येये व दीर्घकालीन ध्येये यांचे हि लिखाण केले. डॉ. दिवे यांनी स्मार्ट ध्येयनिश्चिती हि ठाम, मोजण्यायोग्य, साध्य करण्यायोग्य, वास्तववादी व काळ-मर्यादित असावी, असे प्रतिपादन केले. सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन स्वतःची एक वेगळी ओळख विदयार्थ्यांनी निर्माण करावी असे आवाहन डॉ. दिवे यांनी यावेळी केले. Personality Development Workshop
ज्युनिअर कॉलेज, शिरगावचे प्रा. सचिन जाधव यांनी कार्यशाळेची प्रस्तावना केली, तर प्रा. स्मिता सनदी यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र सोनी यांचे मार्गदर्शन लाभले. Personality Development Workshop