गुहागर, ता. 29 : तालुक्यातील ग्रामपंचायत पाटपन्हाळे सभागृहात पेन्शनर डे निमित्ताने महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी सेवा समिती तालुका शाखा गुहागर या पेंशनर संघटनेची जनरल सभा व मेळावा संघटना अध्यक्ष श्री दत्तात्रय पर्शुराम गुरव यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आला. Pensioners’ Day at Patpanhale
जिल्हा कोषाध्यक्ष श्री कृष्णा बाबू उकार्डे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री दिवाकर धोंडू कानडे यांचे उपस्थितीत जनरल सभेत वय वर्षे ७५ झालेल्या सेवानिवृत्त सभासदांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्तांची तत्परतेने व आत्मियतेने वेळीच कामे केल्याबद्दल गटविकास अधिकारी मा. श्री प्रमोद पांडुरंग केळसकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार संघटना अध्यक्ष मा. श्री दत्तात्रय गुरव यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी केळसकर यांनी उपस्थित सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी मा. श्री सिध्दार्थ शिवराम जाधव, सहसरचिटणीस मा. श्री कृष्णा बाबू उकार्डे जिल्हा कोषाध्यक्ष यानीही मार्गदशन केले. Pensioners’ Day at Patpanhale


यावेळी संघटनेचे माजी राज्य कोषाध्यक्ष श्री विश्वनाथ गणपत बेलवलकर, उपाध्यक्ष श्री गंगाधर राया जाधव, सरचिटणीस श्री शांताराम लक्ष्मण बेंडल, तालुका कोषाध्यक्ष श्री विनायक विष्णू काणेकर, सहसरचिटणीस श्री सिध्दार्थ शिवराम जाधव, श्री रमेश केशव जाक्कर, संघटक श्री संतोष गंगाराम धामणस्कर, सल्लगार सुलतान रसुल मुलाणी, संघटना सदस्या विजया सुभाष कोळवणकर, शर्मिला विलास चव्हाण, अस्मिता अनंत पराडकर, सुप्रिया जयप्रकाश वेल्हाळ, रविंद्र गोपाळ इंदुलकर, देवराम पांडूरंग जाधव, नामदेव गणपत असगोलकर, मनोहर अनंत शिंदे, दत्ताराम टोलू कदम, रमेश गोपाळ बेंडल, दिपक शांताराम तावडे हे उपस्थित होते. Pensioners’ Day at Patpanhale
पेंशनर्स डे मेळावा यशस्वी करण्यासाठी मा.कार्याध्यक्ष श्री विश्वास जयराम बेलवलकर, रविंद्र गोपाळ इंदुलकर, नामदेव गणपत असगोलकर, रमेश केशव जाक्कर, संतोष गंगाराम धामणस्कर, विजया सुभाष कोळवणकर यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सरचिटणीस श्री शांताराम लक्ष्मण बेंडल यांनी केले. Pensioners’ Day at Patpanhale