गुहागर, ता. 30 : गुहागर तालुक्याची राजधानी असलेल्या पाटपन्हाळे ग्रा.पं.ची ग्रामसभा नुकतीच कोंडवाडी साईमंदिर येथे झाली. या ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी दिनेश चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. Patpanhale Tantamukti President Dinesh Chavan
यापूर्वी अजित बेलवलकर यांनी तंटामुक्ती अध्यक्षपद चांगल्या पद्धतीने सांभाळले होते. त्यांचा तंटामुक्ती कमिटीचा कार्यकाल संपल्यामुळे ग्रामसभेने नवीन तंटामुक्ती कमिटी स्थापन केली. या सभेला सुमारे १६० ग्रामस्थ उपस्थित होते. पाटपन्हाळे हे गाव तालुक्याची आर्थिक राजधानी असून सर्वात मोठी बाजारपेठही आहे. पाटपन्हाळे गावामध्ये कोणतेही तंटे पोलीस स्टेशनाला जाणार नाही ते तंटामुक्ती समिती व ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने मिटवले जातील असे नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश चव्हाण यांनी सांगितले. या निवडीबाबत पाटपन्हाळे गावातून तसेच गुहागर तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. Patpanhale Tantamukti President Dinesh Chavan