• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
19 June 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये पाटपन्हाळे महाविद्यालयचे यश

by Ganesh Dhanawade
October 5, 2024
in Guhagar
50 0
1
Patpanhale College Success in District Level Competition
98
SHARES
280
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर तर्फे आयोजन

गुहागर, ता. 05 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वरच्या वतीने कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा आणि नवकल्पना वाढविण्याच्या दृष्टीने दिनांक ०४ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘जिल्हास्तरीय प्रकल्प २०२४’ या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष होते. या स्पर्धेत पाटपन्हाळे महाविद्यालयाने यश संपादन केले. Patpanhale College Success in District Level Competition

विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संकल्पना स्वतःच एक्सप्लोर करण्याची, गंभीर विचारसरणी आणि सर्जनशीलता वाढवण्याची संधी या स्पर्धेच्या निमित्ताने मिळाली. ही नाविन्यपूर्ण स्पर्धा केवळ वैज्ञानिक पराक्रमावर प्रकाश टाकत नाही तर व्यावहारिक शिक्षणाचे सार देखील मूर्त स्वरुपात देते. या स्पर्धेसाठी आलेल्या प्रकल्पांतून तीन सर्वोत्तम प्रकल्पांची निवड करण्यात आली. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील एकूण ०६ कनिष्ठ महाविद्यालये सहभागी झाले होती. यामध्ये १४ समूहाने सहभाग नोंदविला. Patpanhale College Success in District Level Competition

यामध्ये प्रथम क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे, गुहागर महाविद्यालयास प्राप्त झाले. विजेत्या प्रकल्पास रोख रक्कम ७००० रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. द्वितीय व तृतीय क्रमांक रबिया शेख अहमद नाखवा कनिष्ठ महाविद्यालय, पावस रत्नागिरी या महाविद्यालयाच्या ग्रुप दोन व तीन या प्रकल्पधारकांना विजयी घोषित करण्यात आले. यांना प्रत्येकी रु.५००० व रु.३००० इतक्या रकमेचे दोन पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. Patpanhale College Success in District Level Competition

या स्पर्धेचे परीक्षण वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्युत विभागाचे प्रमुख प्रा.सतिश घोरपडे व संगणक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा.केतन कुंडिया यांनी काम पाहिले. स्पर्धेचे समन्वयक प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ.गणेश दिवे यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नरेंद्र सोनी, उपप्राचार्य अविनाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. Patpanhale College Success in District Level Competition

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarPatpanhale College Success in District Level CompetitionUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share39SendTweet25
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.