महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर तर्फे आयोजन
गुहागर, ता. 05 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वरच्या वतीने कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा आणि नवकल्पना वाढविण्याच्या दृष्टीने दिनांक ०४ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘जिल्हास्तरीय प्रकल्प २०२४’ या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष होते. या स्पर्धेत पाटपन्हाळे महाविद्यालयाने यश संपादन केले. Patpanhale College Success in District Level Competition
विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संकल्पना स्वतःच एक्सप्लोर करण्याची, गंभीर विचारसरणी आणि सर्जनशीलता वाढवण्याची संधी या स्पर्धेच्या निमित्ताने मिळाली. ही नाविन्यपूर्ण स्पर्धा केवळ वैज्ञानिक पराक्रमावर प्रकाश टाकत नाही तर व्यावहारिक शिक्षणाचे सार देखील मूर्त स्वरुपात देते. या स्पर्धेसाठी आलेल्या प्रकल्पांतून तीन सर्वोत्तम प्रकल्पांची निवड करण्यात आली. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील एकूण ०६ कनिष्ठ महाविद्यालये सहभागी झाले होती. यामध्ये १४ समूहाने सहभाग नोंदविला. Patpanhale College Success in District Level Competition
यामध्ये प्रथम क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे, गुहागर महाविद्यालयास प्राप्त झाले. विजेत्या प्रकल्पास रोख रक्कम ७००० रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. द्वितीय व तृतीय क्रमांक रबिया शेख अहमद नाखवा कनिष्ठ महाविद्यालय, पावस रत्नागिरी या महाविद्यालयाच्या ग्रुप दोन व तीन या प्रकल्पधारकांना विजयी घोषित करण्यात आले. यांना प्रत्येकी रु.५००० व रु.३००० इतक्या रकमेचे दोन पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. Patpanhale College Success in District Level Competition
या स्पर्धेचे परीक्षण वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्युत विभागाचे प्रमुख प्रा.सतिश घोरपडे व संगणक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा.केतन कुंडिया यांनी काम पाहिले. स्पर्धेचे समन्वयक प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ.गणेश दिवे यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नरेंद्र सोनी, उपप्राचार्य अविनाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. Patpanhale College Success in District Level Competition