• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिली बँकेला भेट

by Ganesh Dhanawade
September 10, 2024
in Guhagar
80 1
1
Patpanhale college students visited the bank
158
SHARES
451
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

राजेंद्र चव्हाण; गर्दीत जाण्यापेक्षा गर्दी निर्माण करण्याची तयारी करा

गुहागर, ता. 10 :  तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील तृतीय वर्ष वाणिज्य वर्गातील विद्यार्थ्यांनी शृंगारतळी येथे असणाऱ्या एचडीएफसी बँकेला बुधवार दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी भेट दिली. विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्राचे प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे यासाठी या भेटीचे आयोजन वाणिज्य विभागाच्या तर्फे करण्यात आले होते. या भेटी वेळी बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री. राजेंद्र चव्हाण आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. Patpanhale college students visited the bank

Patpanhale college students visited the bank

राजेंद्र चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना एचडीएफसी बँकेविषयी थोडक्यात माहिती देऊन राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँका यांच्यातील फरक सांगितला.  तसेच बँकेचे असणारे सर्व व्यवहार, ठेवी आणि कर्जे या विषयी माहिती दिली. बँक कशाप्रकारे व्यवहार करते याची थोडक्यात माहिती देऊन बँकेमध्ये भरती करणारी संस्था म्हणजेच आयबीपीएस संस्थेविषयी माहिती दिली तसेच ही भरती करताना कोणत्या गोष्टींचा अभ्यास करावा याची त्यांनी माहिती दिली. याचबरोबर बँक मुलाखती संदर्भात त्यावेळी तयारी कशी करावी, आपली फाईल कशाप्रकारे असावी तसेच आपली वर्तणूक मुलाखतीच्या वेळी कसे असावे, ड्रेस कोड कसा असावा आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात या संदर्भात विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. अलीकडच्या काळात बँकिंग क्षेत्र कसे बदलले आहे तसेच  एस आय पी, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट याचे स्वरूप कसे असते आणि त्याचा परिणाम कसा होतो याची देखील माहिती विद्यार्थ्यांना सविस्तर दिली. Patpanhale college students visited the bank

भविष्यकाळामध्ये गुंतवणूक करून आपल्याला नियमितपणे कसे फायदे होतात याची माहिती विविध उदाहरणासह दिली. त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना उद्देशून गर्दीत जाण्यापेक्षा गर्दी निर्माण करण्याची तयारी करा असे आवाहन केले. भविष्यामध्ये चांगले जीवन जगण्यासाठी कष्टाची तयारी आवश्यकच आहे यासाठी अनेक गुणांचा विकास कसा करावा हे त्यांनी विविध उदाहरणाद्वारे स्पष्ट केले. दैनंदिन जीवनामध्ये बँकिंग घटकाचा उपयोग कशाप्रकारे होतो कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात. त्याचबरोबर आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये देखील आपण कोणत्या गोष्टी कराव्यात की जेणेकरून आपले करिअर खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते. याची विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. एस एस खोत आणि वाणिज्य विभागाच्या प्राध्यापिका कांचन कदम उपस्थित होत्या. Patpanhale college students visited the bank

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarPatpanhale college students visited the bankUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share63SendTweet40
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.