राजेंद्र चव्हाण; गर्दीत जाण्यापेक्षा गर्दी निर्माण करण्याची तयारी करा
गुहागर, ता. 10 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील तृतीय वर्ष वाणिज्य वर्गातील विद्यार्थ्यांनी शृंगारतळी येथे असणाऱ्या एचडीएफसी बँकेला बुधवार दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी भेट दिली. विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्राचे प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे यासाठी या भेटीचे आयोजन वाणिज्य विभागाच्या तर्फे करण्यात आले होते. या भेटी वेळी बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री. राजेंद्र चव्हाण आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. Patpanhale college students visited the bank
राजेंद्र चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना एचडीएफसी बँकेविषयी थोडक्यात माहिती देऊन राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँका यांच्यातील फरक सांगितला. तसेच बँकेचे असणारे सर्व व्यवहार, ठेवी आणि कर्जे या विषयी माहिती दिली. बँक कशाप्रकारे व्यवहार करते याची थोडक्यात माहिती देऊन बँकेमध्ये भरती करणारी संस्था म्हणजेच आयबीपीएस संस्थेविषयी माहिती दिली तसेच ही भरती करताना कोणत्या गोष्टींचा अभ्यास करावा याची त्यांनी माहिती दिली. याचबरोबर बँक मुलाखती संदर्भात त्यावेळी तयारी कशी करावी, आपली फाईल कशाप्रकारे असावी तसेच आपली वर्तणूक मुलाखतीच्या वेळी कसे असावे, ड्रेस कोड कसा असावा आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात या संदर्भात विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. अलीकडच्या काळात बँकिंग क्षेत्र कसे बदलले आहे तसेच एस आय पी, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट याचे स्वरूप कसे असते आणि त्याचा परिणाम कसा होतो याची देखील माहिती विद्यार्थ्यांना सविस्तर दिली. Patpanhale college students visited the bank
भविष्यकाळामध्ये गुंतवणूक करून आपल्याला नियमितपणे कसे फायदे होतात याची माहिती विविध उदाहरणासह दिली. त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना उद्देशून गर्दीत जाण्यापेक्षा गर्दी निर्माण करण्याची तयारी करा असे आवाहन केले. भविष्यामध्ये चांगले जीवन जगण्यासाठी कष्टाची तयारी आवश्यकच आहे यासाठी अनेक गुणांचा विकास कसा करावा हे त्यांनी विविध उदाहरणाद्वारे स्पष्ट केले. दैनंदिन जीवनामध्ये बँकिंग घटकाचा उपयोग कशाप्रकारे होतो कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात. त्याचबरोबर आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये देखील आपण कोणत्या गोष्टी कराव्यात की जेणेकरून आपले करिअर खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते. याची विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. एस एस खोत आणि वाणिज्य विभागाच्या प्राध्यापिका कांचन कदम उपस्थित होत्या. Patpanhale college students visited the bank