श्री तांदळे, श्री झिंझाड, श्री सरकटे, श्री भास्कर हांडे यांना जाहीर
गुहागर, ता. 22 : पसायदान प्रतिष्ठान गुहागर यांच्यावतीने नुकतेच राज्यस्तरिय कविता व कादंबरी पुरस्कार गुणवत्ताप्रधान कलाकृतींना जाहीर करण्यात आले आहेत. लवकरच जागर साहित्यसंम्मेलनात मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम तीन हजार, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. Pasaydan Foundation Awards Announced
यात पसायदान राज्यस्तरीय उत्कृष्ठ काव्यसंग्रह पुरस्कार २०२३ प्राप्त कलाकृती संकरणातील गिरकी :श्री भास्कर हांडे (प्रसिद्ध साहित्यिक पुणे), अरूणावत : श्री रमेश सरकाटे (प्रसिद्ध लेखक गझलकार भुसावळ), एक भाकर तीन चुली: श्री देवा झिंझाड (प्रसिद्ध लेखक पुणे), डॉ नागनाथ कोत्तापल्ले बहुचर्चित सर्वोत्तम कादंबरी विशेष पुरस्कार रावण : राजा राक्षसांचा : श्री शरद तांदळे (प्रसिद्ध लेखक पुणे) यांना जाहीर करण्यात आले आहेत. सर्वांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. याकलाकृतींनी मराठी साहित्याला वेगळे योगदान दिले आहे. त्या बहुचर्चित कलाकृती आहेत. Pasaydan Foundation Awards Announced