• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 May 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तवसाळ येथील ग्रामदेवतेचा पालखी उत्सव

by Guhagar News
May 7, 2025
in Guhagar
87 1
0
Palkhi festival of the village deity at Tavasal
171
SHARES
488
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर. ता. 07 : सालाबादप्रमाणे अक्षय तृतीयेच्या शुभं मुहूर्तावर तवसाळ येथील ग्रामदेवता श्री महामाई सोनसाखळी देवी भक्तांच्या घरोघरी जावून दर्शन देणार आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  त्यानंतर दि. १८ मे २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता पालखी उत्सव सांगता सोहळ्यास सुरूवात होईल. Palkhi festival of the village deity at Tavasal

शिमगोत्सवात सहानेवरती विराजमान झाल्यानंतर अक्षय तृतीयेपर्यंत  भजन, देवीचा तमाशा, कथानक गण गवळण आधारित देवीचा जागर असे अनेक कार्यक्रम साजरे केले जातात. अक्षय तृतीयेला देवीचा जागर मांड झाल्यावर पालखी नाचविले जाते. नंतर मानकरी यांच्या निवासस्थानी दर्शनाला नेण्यात येते.  दुसऱ्या दिवशी तवसाळ गाव पंचक्रोशीतील घरं घेण्यासाठी तवसाळ गाव खुर्द, तवसाळ पडवे, तवसाळ आगर, तवसाळ मोहिते वाडी शेवटच्या टप्प्यात तांबडवाडी, बाबरवाडी असा पालखी उत्सव सोहळा संपन्न होतो. Palkhi festival of the village deity at Tavasal

तवसाळ तांबडवाडी-बाबरवाडी गावठाण येथे होणाऱ्या पालखी उत्सवानिमित्ताने नवीन गणगवळण सहित वगनाट्य सादर केले जाणार आहेत. दि. १४/०५/२०२५ रोजी अन्याय, दि. १५/०५/२०२५ रोजी वाट पाहते पुनवेची, दि. १६/०५/२०२५ रोजी बाजी प्रभू – एक अजिंक्य योध्दा, दि.- १७/०५/२०२५ रोजी सम्राट बळीराजा  हे वगनाट्य सादर करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे सर्व नमन प्रेमीनी आनंद घ्यावा,  असे बाबर-तांबडवाडी विकास मंडळ मुंबई व ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने निमंत्रित करण्यात आले आहे. Palkhi festival of the village deity at Tavasal

नुकतेच सप्तरंगी संगीत जीवन प्रस्तुत यांच्या संकल्पनेतून साकारलेले अप्रतिम गीत “तवसाळ गावचं आई महामाई रक्षण करी” उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच श्री रविंद्र नाचरे, श्री प्रकाश पांजणे यांच्या सुरात गणेश वंदना गीत “देवधी देवा गजानाथ हे नविन गाण भक्तांच्या भेटीला आले आहे.‌ या गायकांचे गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. Palkhi festival of the village deity at Tavasal

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarPalkhi festival of the village deity at TavasalUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share68SendTweet43
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.