गुहागर, ता. 14 : तालुक्यातील वरवेली येथील श्री हसलाई देवी पालखी नृत्य कला पथकाने अनेक वर्षाच्या कालावधीनंतर पालखी नृत्य पथकाला संजीवनी देऊन पथक/संघ निर्माण करून जिल्ह्यात विविध ठिकाणी नृत्य कला करण्यास सुरुवात केली आहे. शिमगा उत्सवाच्या निमित्ताने वरवेली येथे पालखी नृत्य प्रदर्शनामध्ये हा संघ सहभागी होणार आहे. Palkhi dance performance at Varveli


जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेसाठी हा संघ सज्ज झाला आहे, काही दिवसांचा सराव, जुने सदस्य आणि नवीन सदस्य असे प्रमाण….मात्र आई हसलाईदेवीच्या आशिर्वादामुळे सर्व तरुण मंडळी सहभागी होत आहेत . परंतु या पालखी नृत्य पथकामधील सर्वांचालाडका अलंकार विचारे तसेच गणेश नारकर हे दोन्ही पथकातील सदस्य या पथकामध्ये नसल्याचे दुःखही पालखी नृत्य चाहत्यांना आहे. या दोन्ही सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून पालखी नृत्याला सुरुवात होणार आहे. या पालखी नृत्य पथकाने गेली १८ वर्ष पालखी नृत्य स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. रत्नागिरी जिल्हा स्तरीय स्पर्धेमध्ये अनेक वेळा प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट ढोल वादन उत्कृष्ट सनई वादन व उत्कृष्ट पालखी नृत्यचे बक्षीस प्राप्त केले आहे. Palkhi dance performance at Varveli
जिल्ह्यातील विविध मोठ्या कार्यक्रमांमध्ये श्री हसलाई पालखी नृत्य पथक सहभागी होत असतो. या पालखी नृत्यामध्ये ढोल वाजविण्यामध्ये प्रसाद विचारे, विराज विचारे, रोहित विचारे, सुदीप रसाळ, श्रीनिवास विचारे, अभिजीत झगडे व अन्य सनई सूर संजय आगरे तळवली, उदय विचारे, झान्ज वाजविणे – महेश अवेरे, निशाण नाचविने उमेश रांजाणे, ताशा वाजविणे -विष्णू विचारे, संघनायक – आशिष विचारे, नर्तक – आशिष विचारे, रणजित शिंदे, कुणाल देसाई, पिंट्यादादा नारकर, निलेश रसाळ, संदीप रसाळ, समीर महाडिक, मनोज किर्वे, सौरभ विचारे, गिरीधर रांजणे, ऋतिक किर्वे , अभिजित झगडे, आदिनाथ रावनंग, अनिकेत शिंदे, चिराग विचारे त्याचप्रमाणे व्यवस्थापक म्हणून विलास विचारे, चंद्रशेखर विचारे, दीपक विचारे, राजेंद्र विचारे , श्याम नारकर आणि समस्त वरवेली गावातील तरुण पिढी सहभागी होणार आहे. Palkhi dance performance at Varveli