• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 May 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पालशेत पुलाचे युद्धपातळीवर काम सुरू

by Ganesh Dhanawade
May 11, 2024
in Guhagar
150 1
0
Palashet bridge work on war level

पालशेत बाजारपेठ येथील पुलाचे सुरू असलेले काम

294
SHARES
841
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पुलाचे ५० टक्के काम पूर्ण

गुहागर, ता. 11 : तालुक्यातील कोस्टल मार्गावरील पालशेत बाजारपेठ येथील पुलाचे काम ५० टक्के पूर्ण झाले असून सदर काम पावसाळा सुरू होण्याअगोदर पूर्ण करणे. एकप्रकारे आव्हानच बनले आहे.  या पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. Palashet bridge work on war level

सार्वजनिक बांधकामच्यावतीने सुरू असलेल्या या पुलाच्या उभारणीकरीता बजेटमधून ३ कोटी रूपये मंजूर झाले आहेत. पुलाचे कामाचा शुभारंभ करताना खाडीमधीलच रेतीच्या सहाय्याने पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडयापासून पुलाच्या कामाला सुरूवात करण्यात आली होती. गेल्या अडीच महिन्यात पुलाचे काम जलद गतीने झाले असल्याचे पहावयास मिळत आहे. पुलाचे दोन स्लॅप पूर्ण झाले आहेत. उर्वरीत दोन स्लॅप शिल्लक आहेत. यामुळे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. सदर पुल हा बाजारपेठेतील रस्त्यापेक्षा दोन ते अडीच मिटरने उंच तर ६७.८ मिटर लांब आहे. पुलाखालून पाणी जाण्यासाठी मोठी जागा असल्याने दरवर्षी पाणी भरण्याची निर्माण होणारी समस्या कायमची दूरू झाली आहे.  Palashet bridge work on war level

मात्र सदर पुलाचे काम पावसाळयाअगोदर करणे आव्हानात्मक ठरले आहे. जर ५० टक्के कामाला दिड महिना लागला तर उर्वरीत ५० टक्के कामासाठी जास्त कालावधी शिल्लक राहत नाही. यामुळे पावसाळा सुरू होण्याअगोदर काम पूर्ण होणे गरजेचे बनले आहे. तर काम लवकरात लवकर पूर्ण करू, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक शाखा अभियंता योगेश थोरात यांनी व्यक्त केला आहे. Palashet bridge work on war level

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarPalashet bridge work on war levelUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share118SendTweet74
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.